Karapur Mega Project: दिल्लीत घुमला कारापूरवासीयांचा 'आवाज'; मेगा प्रकल्‍प विरोधाचा शंभरावा दिवस, 'जंतरमंतर'वर छेडले आंदोलन

Karapur Mega Project Protest: कारापूर येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाविरोधातील लढ्याला सोमवारी १०० दिवस पूर्ण झाले.
Karapur Mega Project Protest
Karapur Mega ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : कारापूर येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाविरोधातील लढ्याला सोमवारी १०० दिवस पूर्ण झाले. या निमित्ताने केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कारापूरवासीयांनी नवी दिल्लीतील ‘जंतर-मंतर’वर आंदोलन करत प्रकल्पाविरोधातील भूमिका ठामपणे मांडली. त्याचवेळी पणजीतील आझाद मैदानावरही निदर्शने करण्यात आली.

सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्वप्‍निल सालेलकर, ॲड. अजय प्रभुगावकर आणि स्वप्नेश शेर्लेकर यांनी केले. आंदोलनात गौरेश घाडी, नंदा सावळ, सातू सालेलकर, बाबी पळ,नाणसेकर, रिमा गावकर, यमुना घाडी, राधा सालेलकर, सुलोचना मांद्रेकर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पविरोधक सहभागी झाले. स्थानिक महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.

Karapur Mega Project Protest
Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक, जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

‘वादग्रस्त प्रकल्प आम्हाला नकोच’, ‘आम्हाला न्याय द्या’ अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचे आणि दिल्लीकरांचे लक्ष वेधून घेतले. दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस तसेच ‘आप’च्या राष्ट्रीय नेत्या आतिषी मार्लेना यांनी आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला.

याशिवाय ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, शंकर पोळजी, मनीषा उसगावकर तसेच ‘गोंयचो एकवोट’सह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होत कारापूरवासीयांच्या लढ्याला समर्थन दिले.

Karapur Mega Project Protest
Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

कारापूर मेगा प्रकल्पाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसारच गोवा सरकार पुढील कार्यवाही करेल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com