Mahadayi Water Dispute: 'म्हादई'च्या मुद्यावरून भाजप कर्नाटकच्याच बाजुने? कळसा-भांडुरा प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यातून दिले आश्वासन
BJP Manifesto for Karnataka Assembly Election 2023
BJP Manifesto for Karnataka Assembly Election 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Kalasa Bhandura Project: म्हादई नदीवरील कळसा आणि भांडुरा उपनद्यांवरील प्रकल्प वेळेत पुर्ण करू, असे आश्वासन भाजपने कर्नाटकला दिले आहे. कर्नाटक निवडणुकीसाठीचा जाहीरनामा भाजपने सोमवारी जाहीर केला. या जाहिरनाम्यात हे आश्वासन देण्यात आले आहे.

दक्षिणेकडील या राज्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह या भाजपच्या प्रमुख नेत्यांसह केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक नेते कर्नाटक प्रचारात उतरले आहेत.

(BJP Manifesto for Karnataka Assembly Election 2023)

BJP Manifesto for Karnataka Assembly Election 2023
CM Pramod Sawant: गोव्यातील 90 टक्के गुन्हे बिहार, युपीतील कामगारांमुळे; मुख्यमंत्र्यांचा परप्रांतीयांवर निशाणा

उत्तर कर्नाटकात नागरिकांचा भाजपला पाठिंबा मिळावा म्हणून यापुर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बेळगावमधील सभेत म्हादई कर्नाटकला दिली, असे वक्तव्य केले होते. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने म्हादई कर्नाटकला दिली, असे ते म्हणाले होते.

त्यामुळे गोव्यात असंतोष निर्माण झाला होता. सध्या हा प्रश्न कोर्टातही आहे. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर गोव्यात सेव्ह म्हादई ही मोहिम सुरू झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने म्हादई प्रवाह नावाने प्राधिकरण देखील स्थापन झाले आहे.

BJP Manifesto for Karnataka Assembly Election 2023
Zero Shadow Day in Goa: गोव्यात उद्या तुमची सावली होणार गायब; जाणून घ्या वेळ...

तथापि, म्हादईबाबत कर्नाटकचे राजकीय नेते प्रचंड आक्रमक आहेत, आणि ते त्यांची कामे रेटून करत आहेत.

दरम्यान, या जाहीरनाम्यात कळसा-भांडुरा प्रकल्पासह कर्नाटकातील सर्व प्रमुख प्रलंबित सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे. यात भद्रा, अप्पर कृष्णा या प्रकल्पांचाही समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com