CM Pramod Sawant: गोव्यातील 90 टक्के गुन्हे बिहार, युपीतील कामगारांमुळे; मुख्यमंत्र्यांचा परप्रांतीयांवर निशाणा

ऐन जागतिक कामगार दिनीच मुख्यमंत्र्यांची टीका
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant on UP, Bihar Workers: गोव्यात घडणारे 90 टक्के गुन्हे हे बिहार, उत्तर प्रदेशातून आलेल्या परप्रांतीय कामगारांमुळेच घडले आहेत. राज्यातील बहुतांश गुन्ह्यांना परप्रांतीय कामगार जबाबदार आहेत, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. ऐन जागतिक कामगार दिनीच मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली आहे.

CM Pramod Sawant
Zero Shadow Day in Goa: गोव्यात उद्या तुमची सावली होणार गायब; जाणून घ्या वेळ...

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात घडलेले बहुतांश गुन्हे हे बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगार वर्गातील लोकांकडून झाले आहेत. यात बिहार, उत्तर प्रदेश आणि देशातील इतर राज्यांचा समावेश आहे.

यापुढे अशा गुन्हेगारीवर नियंत्रण राहावे म्हणूनच राज्य सरकारने लेबर कार्डची योजना आणली आहे. लेबर कार्डसाठी नावनोंदणी करणे महत्वाचे आहे. त्यातून गोव्यात येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीय कामगाराची ओळख पटवणे सोपे होणार आहे.

कंत्राटदारांनी सर्व कामगारांकडे लेबर कार्ड असावे, याची खात्री करावी. असे कामगार जर एखादा गुन्हा करत असतील तर पोलिसांना अशा कामगारांना ट्रॅक करणे सोपे झाले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Convoy Accident
home minister amit shah reviews goa st reservation file
cm pramod sawant
CM Pramod sawant sanad distribution margao
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com