Kadamba Recruitment: गोमंतकीय तरुणांसाठी सुवर्णसंधी! कदंब महामंडळात 300 पदांसाठी मेगा भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

Kadamba Recruitment 2026: कदंब वाहतूक महामंडळाने चालक व वाहक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया हाती घेतली असून एकूण ३०० कंत्राटी पदे भरण्यात येणार आहेत.
Kadamba Recruitment 2026
KadambaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाने चालक व वाहक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया हाती घेतली असून एकूण ३०० कंत्राटी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून २५ व २६ जून रोजी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

कदंब महामंडळाने जारी केलेल्या माहितीनुसार २०० वाहक आणि १०० अवजड वाहन चालक पदांची भरती कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २२ हजार रुपये एकूण मानधन देण्यात येणार आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kadamba Recruitment 2026
RO RO Ferry: कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई ते विजयदुर्ग रो रो फेरी घेणार आणखी 2 थांबे; प्रवाशांसाठी मोठी सुविधा

या पदांसाठी थेट मुलाखती २५ आणि २६ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पर्वरी येथील कदंबच्या केंद्रीय कार्यशाळेत घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना कदंबच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला एका वर्षाच्या कंत्राटावर केली जाईल. मात्र महामंडळाच्या गरजेनुसार हा कालावधी पुढे वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com