Kadamba Bus: ‘कदंब’ पुन्‍हा अवघड वळणावर! आर्थिक वर्षात 2 कोटी 65 लाखांचा तोटा

Kadamba Transport Corporation Limited: कदंब महामंडळाच्‍या आर्थिक स्थितीबाबत विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यास वाहतूक खात्याने लेखी उत्तर दिले आहे.
Kadamba Bus Goa
Kadamba BusDainik Gomantak
Published on
Updated on

Kadamba bus financial loss 2023 24

पणजी: कदंब परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीविषयी दरवर्षी विधानसभेत प्रश्‍‍न विचारले जातात. त्‍यातून महामंडळ २०२२-२३ मध्ये ५.८९ कोटी रुपये मिळवून फायद्यात आल्याचे दिसून आले. परंतु गतवर्षी महामंडळ पुन्‍हा तोट्यात आल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

कदंब महामंडळाच्‍या आर्थिक स्थितीबाबत विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यास वाहतूक खात्याने लेखी उत्तर दिले आहे. या उत्तरात २०२१-२२ या आर्थिक वर्षात १९५ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल मिळाला तर महामंडळाला १९६ कोटी ६५ लाख खर्च झाल्याचे नमूद करण्‍यात आले आहे. या आकडेवारीवरून त्यावर्षी महामंडळाला ८३.२१ लाखांचे नुकसान सोसावे लागले.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात महामंडळाला २४५ कोटी ६६ लाख रुपये महसूल मिळाला तर २३९ कोटी ७७ लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच महामंडळाला ५ कोटी ८९ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दिसून आले.

Kadamba Bus Goa
Kadamba Bus: साखळी ते पणजी धावणारी 'कदंब' गायब? कारापूर-सर्वणमधील विद्यार्थी अडकले, बेभरवशाच्या सेवेमुळे अनेकांना फटका

२०२२-२३ मध्ये मिळालेल्या नफ्यामुळे २०२३-२४ मध्ये महामंडळाला आणखी नफा होणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच. या आर्थिक वर्षात महामंडळाकडे २६५ कोटी ७३ लाख रुपयांचा महसूल जमा झाला तर २६८ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे २ कोटी ६५ लाखांचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला.

महत्त्‍वाची बाब म्हणजे २०२२-२३ मध्ये महामंडळ फायद्यात आले. त्यास सरकारचा आर्थिक मदतीचा हात कारणीभूत ठरला. सरकारने महामंडळाला मोठी मदत केल्याने त्या आर्थिक वर्षांत महामंडळ सुमारे पावणे सहा कोटींवर फायद्यात दिसून आले.

Kadamba Bus Goa
Goa Kadamba Issue: 'कदंबाच वेळेत येणार नसेल तर पासचा काय फायदा'? प्रवास वेळखाऊ; वेळापत्रक बदलल्याने प्रवासी त्रस्त

तोटा का होतो?

महामंडळ सतत तोट्यात का जात आहे, त्याची कारणेही देण्‍यात आली आहेत. त्‍यात फायद्यात नसलेल्या मार्गांवर बसेस धावणे, शाळांना ७० टक्के तसेच इतर ६० टक्के सवलती देणे, कामगारांचे वाढविलेले वेतन, इंधनाचा वाढीव दर आदी प्रमुख कारणे आहेत.

‘कॅग’च्या अहवालानुसार महामंडळाला झालेले एकूण नुकसान १६९ कोटींवर पोहोचले आहे. ते भरून काढण्याचे एक मोठे आव्हान महामंडळापुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com