Goa Congress: राजीव गांधींचे राष्ट्र, गोव्यासाठीचे योगदान युवकांनी जाणून घ्यावे

काँग्रेस नेत्यांची अपेक्षा : भवनात वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
Goa Congress
Goa CongressGomantak Digital Team

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्र व गोव्यासाठी असलेले योगदान राज्यातील युवकांनी जाणून घ्यावे, असे आवाहन करीत काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळी बांबोळी येथील राजीव गांधी स्मृती संकुलातील त्यांच्या पुतळ्याला काँग्रेस नेत्यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दहशतवादाविरुद्ध लढा आणि समाजात शांतता जपण्याची शपथ उपस्थितांना दिली. त्यानंतर काँग्रेस भवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी उपस्थित नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Goa Congress
Suchandra Dasgupta Passes Away : बाईकसमोर अचानक सायकल ,मागुन ट्रक आला अन् जागीच... अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ताचा मृत्यू

पाटकर म्हणाले, राजीव गांधी यांच्या प्रयत्नांमुळे कोकणी मातृभाषा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झाली, ही गोव्यासाठी अभिमानाचा बाब आहे. आज आपण जगात कुठेही गेलो, तरी आपली एक वेगळी ओळख झाली आहे. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे, ते लोकांचा आवाज दाबत आहेत. कर्नाटकच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना घराची वाट दाखवून एक नवी दिशा दाखविली आहे.

Goa Congress
Education Department: पालकांसाठी महत्वाची बातमी; सरकार रेनकोटसाठीचे पैसे आता...

याप्रसंगी खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार कार्लोस फेरेरा, मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर, गुरुदास नाटेकर, व्हिरियतो फर्नांडिस यांची भाषणे झाली. यावेळी सुभाष फळदेसाई, सावियो डिसोझा, जिल्हाध्यक्ष डॉ. वीरेंद्र शिरोडकर व सावियो डिसिल्वा, महिला प्रमुख बीना नाईक, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. एम. के. शेख यांनी सूत्रसंचालन केले. पणजीकर यांनी आभार मानले.

Goa Congress
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

द्वेषाची दुकाने बंद करा!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, आज जगभरात आणि भारतातही हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. शांतता बिघडवणाऱ्या दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे.

जातीय राजकारण थांबवले पाहिजे आणि द्वेषाची ‘दुकाने’ बंद केली पाहिजेत. राजीव गांधी हे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि त्यांनी आर्थिक सुधारणांमध्ये योगदान दिले, औद्योगिक क्रांती घडविली. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी मूलभूत गोष्टी निर्माण केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com