Justice Yashwant Varma: घरातील बेहिशेबी पैसा न्या. यशवंत वर्मा यांचाच, चौकशी समितीचा अहवाल संसदेत सादर

Yashwant Varma Delhi House Cash: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्या. यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील घरात मोठ्या प्रमाणात पैसा सापडला होता.
Yashwant Varma Delhi House Cash
Justice Yashwant VarmaDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्या. यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील घरात मोठ्या प्रमाणात पैसा सापडला होता. हा पैसा त्यांचाच होता आणि यासंदर्भात त्यांनी दिलेले स्पष्टीकरण टाळाटाळ करणारे व समाधानकारक नव्हते, असा निष्कर्ष लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीने काढला आहे.

समितीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज सादर झाला. न्या. वर्मा यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य असून बेहिशेबी पैसा सापडणे, महत्त्वाच्या साक्षी पुराव्यांत फेरफार करणे व तपासात टाळाटाळ करण्याबाबतचे त्यांच्यावरील आरोप योग्य असल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे.

Yashwant Varma Delhi House Cash
Goa Film City Demand: "गोव्यात फिल्म सिटी उभारा!", ESG सदस्य शर्मद पै रायतुरकर यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निर्देशावरून झालेल्या अंतर्गत चौकशीत न्या. वर्मा यांच्यावर प्रतिकूल ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी न्यायाधीश तपास कायद्यान्वये न्या. वर्मा यांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली होती.

अशी समिती स्थापन करण्याला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. तीन सदस्यांच्या समितीने दोन खंडामध्ये अहवाल संसदेत सादर केला आहे. त्यातील एका खंडामध्ये तोंडी व लेखी पुराव्यांचा समावेश आहे.

Yashwant Varma Delhi House Cash
Goa FDA Action: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; बेळगावातील पुरवठादाराकडून 120 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करुन केली नष्ट

अहवालातील नोंद

सापडलेला पैसा जप्त करण्यात आला नाही अथवा त्याची मोजणी करण्यात आली नाही. घटनास्थळाचा पंचनामा किंवा पैशाचे नमुने सुरक्षित ठेवले नाहीत. असे असतानाही पैसा मोठ्या प्रमाणात होता, ही बाब सिद्ध होत असल्याचे चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com