Goa Fire: जुनसावाडा-मांद्रे टेकडीवर भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Mandrem Fire
Mandrem FireDainik Gomantak
Published on
Updated on

मागील काही महिन्यांत गोव्यात आगीचे सत्र सुरु होते. म्हादई जंगलातील आग तर बरेच दिवस धुमसत होती. अग्निशमन दलाचे प्रयत्न काहीसे तोकडे पडू लागल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले होते.

दरम्यान, गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगींमुळे वृक्षसंपदेसह बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते.

Mandrem Fire
Goa Corona Update: गोव्यात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 539 वर; नवीन 'इतक्या' रूग्णांची भर

अशीच एक घटना समोर येतेय. जुनसावाडा-मांद्रे टेकडीवर संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती प्राप्त होतेय. मात्र अग्निशमन दल अद्याप तरी घटनास्थळी पोहोचले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Mandrem Fire
Motorsports: राज्यातील रेसर्ससाठी महत्वाची बातमी! मोटरस्पोर्टस अरेनासाठी संघटनेतर्फे प्रयत्न सुरू

गोव्यात मागील महिन्यात सत्तरीपासून ते काणकोणपर्यंतच्या जंगलात आगींच्या घटना घडल्या. या वणव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलातील वनसंपदा खाक झाली.

राज्य सरकारने व्यापक प्रयत्न करून या आगीच्या घटना आटोक्यात आणल्या. भारतीय वायुसेना देखील यावेळी सरकारच्या मदतीला धावून आली, राज्यातील आगीची नोंद केंद्र सरकारने देखील घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com