Sunburn Goa 2023: 28 अटींच्‍या पूर्ततेची सक्‍ती; उल्‍लंघन झाल्‍यास फेस्‍टिवल बंद

Sunburn Goa 2023: जाहिरातीतून 31 तारीख हटवली
Sunburn Goa 2023
Sunburn Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Sunburn Goa 2023: वागातोर येथे 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत सनबर्न फेस्‍टीवल होत आहे. त्‍यासाठी पर्यटन खात्‍याने तात्‍पुरती परवानगी देताना 28 अटींची पूर्तता करण्‍याची सक्‍ती केली आहे.

तसेच खंडपीठाने दणका दिल्‍यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्‍या झाल्‍या असून आयोजनस्‍थळी ध्‍वनिप्रदूषण तसेच अमली पदार्थांचा वापर रोखण्‍यासाठी अधिकारी तैनात असणार आहेत.

Sunburn Goa 2023
Mahadayi Water Dispute: 'म्हादई'साठी कर्नाटकची पुन्हा वळवळ; सिद्धरामय्यांचे मोदींना साकडे

या संदर्भात उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्‍सन यांनी आज माहिती दिली. सनबर्न आयोजकांनी 31 डिसेंबरला फेस्‍टीवल होणार नाही, असे जाहीर करूनही 31 तारखेची तिकीट विक्री सुरू होती. त्‍यावरून संभ्रम निर्माण झाला होता.

सोशल मीडियावरून निरनिराळे तर्क काढले जात होते. सरकारवरही टीका होत होती. अखेर रात्री आयोजकांनी आपल्‍या वेबसाईटवरील जाहिरातीतून ३१ तारीख हटवली व सदर विषयावर पडदा पडला.

प्रशासनाची अशी असेल तयारी:-

1. सनबर्नस्‍थळी पोलिसांबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित असतील.

2. सनबर्नच्या म्युझिक सिस्टिमचा आवाज त्यांना देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा वाढल्यास त्याची मोजमाप करणारी यंत्रे मंडळातर्फे तेथे बसवण्यात येणार आहेत.

3. त्यामुळे जे गेल्यावर्षी उल्लंघन झाले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तीनही दिवस पोलिस व मंडळाचे अधिकारी काळजी घेतली.

4. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्वरित म्युझिक सिस्टीम जप्त करण्यात येईल, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

जारी केलेल्‍या अटी

  • महोत्‍सव क्षेत्र धूम्रपानरहित असावे. प्रभावी वाहतूक व्यवस्थापन, पार्किंगसाठी वाहतूक कक्षाशी संपर्क साधावा.

  • आयोजकांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि टप्प्यांचे रेखाचित्र, संरचना स्थिरता अहवाल सादर करावा.

  • अमलीपदार्थांचा वापर किंवा सेवन होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्‍यावी.

  • फेस्‍टीवलमध्‍ये सहभागी होणारे प्रेक्षक आणि सामान्य जनता यांच्या सुरक्षेसाठी आयोजक जबाबदार असतील.

  • परिसरात कोणत्‍याही प्रकारे अश्‍‍लील प्रदर्शन, कृत्ये होऊ नयेत, ज्यामुळे राज्‍य सरकारची प्रतिमा डागाळेल.

  • अटी व नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणत्‍याही क्षणी फेस्‍टीवल थांबविण्याचा अधिकार राज्‍य सरकारला असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com