गोव्यातून विदेशात जाणे झाले सुलभ

गोव्यातील दाबोळी विमानतळावर ‘आरटीपीसीआर’ चाचणीची सोय
Airport
AirportDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: गोव्यातून (Goa) विदेशात जाणाऱ्या गोमंतकीयांच्या सोयीसाठी दाबोळी विमानतळावर ‘आरटीपीसीआर’ची (RTPCR) सोय करण्यात आल्याने विदेशात जाणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

परदेशात जाणाऱ्या देशातील नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले, तरी त्यांच्याकडून ‘आरटीपीसीआर’ची चाचणी अहवालाची मागणी केली जाते. गोव्यातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी दाबोळी विमानतळावर ‘आरटीपीसीआर’ चाचणीची सोय नसल्याने एअर अरेबियाने दाबोळी विमानतळावर आपली विमानसेवा बंद केली होती. १० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान एअर अरेबियाच्या दाबोळी विमानतळावर १७ फेऱ्या होत्या. त्यापैकी १० ऑगस्ट रोजी १०७ प्रवासी, तर १३ ऑगस्ट रोजी १२० प्रवासी घेऊन एअर अरेबियाचे विमान दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते.

Airport
Goa: चाटर्ड विमान सेवा सुरू करा

दाबोळी विमानतळावर रेपिड अँटिजेन चाचणीची सोय नसल्याने एअर अरेबियाने ११, १४, १८, २१, २५, २८ ऑगस्ट रोजीच्या विमानाच्या फेऱ्या रद्द केल्या होती. त्यामुळे तिकिटांचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना ही तिकिटे रद्द करून मुंबईहून जाण्यासाठी विमानांची तिकीटे नव्याने काढावी लागली होती. मात्र, त्यासाठी पूर्वी बुकिंग केलेल्या तिकिटांचे पैसे मिळत नसल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत होते. तसेच विमानाची तिकिटे शेवटच्या क्षणी काढावी लागत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता.

चार हजार रुपये शुल्क

युएईच्या निर्गमनच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएलसीपीमधील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ‘आरटीपीसीआर’चाचणी सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे गोवा येथून युएईला जाण्याची सोय होईल. त्यासाठी चार हजार रुपये चाचणी शुल्क आकारले जात आहे.

Airport
Goa Govt. Jobs: गोवा सरकार नोकऱ्या विकत आहे ?

ऑक्टोबरपासून चार्टर विमाने येणे शक्य

पुढील दोन महिने कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यास ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू होऊन गोव्यासह भारतात विदेशी पर्यटकांची चार्टर विमाने दाखल होतील. चार्टर विमानांसंदर्भातील निर्णय केंद्र सरकारच घेईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुतोवाच केले आहे. विदेशी पर्यटकांच्या चार्टर विमानांना गोव्यात येण्यास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली आहे, पण हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. यासंदर्भातील निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकते. नियमावली जारी करून चार्टर विमाने गोव्यात घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com