Pernem Crime : बलात्कार नव्हे चोरीच्या उद्देशाने तंबूत घुसलो !

संशयिताचा दावा : डच महिला हल्ला प्रकरणी रिसॉर्टवर कारवाई
Crime News
Crime News Gomantak Digital Team
Published on
Updated on

पणजी : मांद्रे येथील एका रिसॉर्टच्या तंबूमध्ये डच महिलेवर बलात्काराच्या नव्हे तर चोरीच्या उद्देशाने संशयित अभिषेक वर्मा या तरुणाने प्रवेश केला होता. त्याच्या प्रवेशाने तिला चाहूल लागली व ती आरडाओरड करील,

या भीतीने तिचे तोंड दाबण्याचा त्याने प्रयत्न केला, अशी माहिती संशयिताने प्राथमिक चौकशीत पोलिसांना दिली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या हलगर्जीपणाबद्दल रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पेडण्याचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत देसाई यांनी दिली.

एका रिसॉर्टच्या तंबूमध्ये राहणाऱ्या पर्यटकांसाठी तेथे कोणतीच सुरक्षा तैनात केली नव्हती. गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत असलेल्या डच पर्यटक महिला तसेच तिला वाचवताना आरोपीकडून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेला युरिको डायस या दोघांच्याही पेडणे पोलिसांनी जबान्या नोंदवल्या आहेत. विदेशी पर्यटक महिलेने दिलेल्या जबानीत संशयिताने तंबूत प्रवेश केल्यानंतर तिचे सामान उचलण्याचा प्रयत्न करू लागला.

Crime News
MLA Disqualification Petition : अपात्रता याचिकेवर आज सुनावणी; आमदारांची मते जाणून घेणार

तिने त्याला प्रतिकार केला असता त्याने तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरड केल्याने त्याने आवाज बंद करण्यासाठी धडपड केली. मात्र, एका तरुणाने मदतीसाठी येऊन त्याच्या कचाट्यातून आपली सुटका केली. काही मिनिटांनी तो परत आला व त्याने तिच्यावर तसेच वाचवणाऱ्या डायसवर चाकूने वार केले. जखमी डायसनेही झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News
Parineeti - Raghav Chadha Love Story: परिणिता आणि राघव चढ्ढा पहिल्यांदा इथे भेटले आणि एकमेकांवर फिदा झाले...

व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा

रिसॉर्टमधील कामगार अभिषेक वर्मा हा परप्रांतीय असल्याने त्याची पोलिसांकडून पार्श्वभूमी तपासण्यात आली नव्हती. प्रत्येक हॉटेल तसेच रिसॉर्टने कामगार नेमताना त्यांची कामगार खात्याकडे नोंदणी करून गोवा कामगार ओळखपत्र घेणे सक्तीचे आहे, तरी त्याकडे रिसॉर्ट व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंदवला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Crime News
Goa Budget 2023 : पुढील दोन वर्षांत 20 हजार रोजगार!

उत्तराखंड पोलिसांशी संपर्क

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अभिषेक वर्मा हा मूळचा डेहराडून - उत्तराखंड येथील रहिवासी आहे. गेल्या काही महिन्यापासून तो गोव्यात रिसॉर्टमध्ये वेटरचे काम करत आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याचे या घटनेने सिद्ध होते. त्याने इतर राज्यात असे प्रकार केलेत का,याची शहानिशा करण्यासाठी त्याची माहिती उत्तराखंड तसेच इतर राज्यांत पोलिसांकडे छायाचित्रासह पाठवली आहे.

विदेशी पर्यटक महिलेवरील हल्ल्यामुळे गोव्याची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत पर्यटकांचे सामान लंपास होण्याचे तसेच त्यांच्यावरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com