Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग नऊ सामने अपराजित असलेल्या एफसी गोवा संघाला जबर झटका बसला आहे. हुकमी खेळाडू स्पॅनिश मध्यरक्षक व्हिक्टर रॉड्रिगेझ दुखापतीमुळे 2023-24 मधील बाकी मोसम खेळू शकणार नाही.
गतआठवड्यात एफसी गोवाने कोलकाता येथे एफसी गोवाने मोहन बागान सुपर जायंट्सला 4-1 फरकाने हरविले. त्या लढतीत व्हिक्टरने एक गोल केला होता, मात्र याच लढतीत त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली.
दुखावलेल्या पायाची सखोल वैद्यकीय चाचणी केल्यानंतर 34 वर्षीय खेळाडू बाकी मोसम एफसी गोवा संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही हे सिद्ध झाले.
व्हिक्टरने यंदा आयएसएल स्पर्धेतील नऊ सामन्यांत तीन गोल केले आहेत. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवातर्फे तो सहा सामन्यांत सार्टिंग लिस्टमध्ये होता, तर तीन सामने बदली खेळाडू होता.
गतमोसमात ओडिशा एफसीतर्फे खेळलेल्या व्हिक्टरला एफसी गोवाने जुलै 2023 मध्ये करारबद्ध केले होते. एफसी गोवा संघाने सध्या आयएसएल स्पर्धेत सात विजय व दोन बरोबरी या अपराजित कामगिरीसह 23 गुणांची कमाई केली आहे.
त्यांचा पुढील सामना शुक्रवारी (ता. 29) गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध खेळला जाईल. व्हिक्टर रॉड्रिग्ज अनुपलब्ध ठरल्यामुळे आता एफसी गोवास बदली खेळाडूसाठी जानेवारी महिन्यातील ट्रान्सफर विंडोची प्रतीक्षा करावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.