TMC Goa: ममतादीदींचा तृणमूल काँग्रेस गोव्यातून बाहेर पडणार? राष्ट्रीय प्रवक्त्याने स्पष्ट केली भूमिका

Trinamool Congress Goa: तृणमूल काँग्रेस पक्षाने २०२२ साली गोव्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती पण, पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही.
Trinamool Congress Goa
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

Trinamool Congress Goa

पणजी: ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यातून बाहेर पडणार अर्थात यापुढे पक्ष गोव्यातून निवडणूक लढणार नाही, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांवर तसेच, गोव्यातील आगामी निवडणुकांबाबत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

"तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यातून जाणार या केवळ अफवा आहेत", असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी स्पष्ट केले. पक्ष राज्यातून बाहेर जाणार असे अफवा पसरवल्या जात आहेत. पण, त्यात तथ्य नसल्याचे डिमेलो यांनी सांगितले.

तसेच, आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुका देखील पक्ष लढवणार असून, पक्षाने तळागाळातून काम करण्यास सुरुवात केल्याचे डिमेलो म्हणाले. यावेळी पक्षाचे सह संयोजक मारीयानो रॉड्रिग्ज उपस्थित होते.

Trinamool Congress Goa
Porvorim Flyover: गोंयकाराची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; या उड्डाणपूलाचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला काम करण्यासाठी फार कमी वेळ मिळाला तरी देखील आम्ही आठ टक्के मते घेतली. पक्ष तेव्हापासून काम करत आहे. येत्या काळात होणाऱ्या जिल्हा पंचायत आणि त्यानंतरच्या विधनासभा निवडणूक देखील आम्ही लढवू. दरम्यान, युतीबाबत राष्ट्रीय नेते निर्णय घेतील, असे डिमेलो यांनी स्पष्ट केले.

गोव्यात पक्षाचे आमदार किंवा खासदार नाहीत. पण, पक्षाचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन गोव्यातील विविध समस्या आणि विषय राज्यसभेत मांडत असतात. यापुढे देखील पक्ष गोव्यातील स्थानिक मुद्दे मांडत राहिल असे, डिमेलो म्हणाले. तृणमूल काँग्रेस पक्षाने २०२२ साली गोव्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती पण, पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही.

Trinamool Congress Goa
Viral: परदेशी महिला पर्यटकाला बघून त्याने मोबाईल बाहेर काढला आणि...; गोव्यातला संतापजनक व्हिडिओ व्हायरल

गेल्या निवडणुकीत केला सर्वाधिक खर्च

तृणमूल काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ४७.५४ कोटी रुपये खर्च केले होते. पण, त्याबदल्यात पक्षाला एकही उमेवाद निवडून आणता आला नाही. या निवडणुकीत पक्षाने २३ उमेदवार उभे केले होते. याच निवडणुकीत भाजपने मात्र १७.७५ कोटी खर्च करत २० आमदार निवडून आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com