‘हे सरकार खरच गोमंतकीयांच्या हिताचे रक्षण करणारे आहे का?’

परप्रांतीयांच्या बेकायदेशीर घरांना कायदेशीर मान्यता देण्यारे प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) सरकार.
CM Pramod Sawant and Girish Chodankar
CM Pramod Sawant and Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एका बाजूने परप्रांतीयांच्या बेकायदेशीर घरांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) सरकार भूमिपुत्र (Bhumiputra bill) अधिकारिणी विधेयक आणत असतानाच त्यांचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आपल्या कारखाने आणि बाष्पक कार्यालयात सरकारी नोकरीसाठी दोन नाशिकच्या उमेदवारांना पात्र ठरवीत असल्याचा आरोप काँग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केला. हे सरकार खरेच गोमंतकीयांचे हितरक्षण करणारे आहे का? असा सवाल त्यांनी केला. (Is BJP government really protecting interests of Gomantak)

कारखाने आणि बाष्पक खात्यात बहुउद्देशी कामे करण्यासाठी नोकरभरती होत असून यात पात्र उमेदवारांची जी अंतिम यादी तयार करण्यात आली आहे, त्यात दोन नाशिकच्या उमेदवारांची नावे आहेत असा उल्लेख करत हे नवीन भूमिपुत्र का असा सवाल चोडणकर यांनी केला.

CM Pramod Sawant and Girish Chodankar
Goa : नवीन सीझेडएमपी आराखड्यातून कासव पैदास केंद्रे गळाली

सध्या गोव्यात अनेक युवक बेरोजगार आहेत. त्यांना हे सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही आणि नाशिकच्या उमेदवारांना आमच्या युवकांच्या नोकऱ्या कशा मिळतात असा सवाल करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासंबंधी कारखाने आणि बाष्पक खात्याच्या कार्यालयातून आलेल्या खुलाशाप्रमाणे ही निवड प्रक्रिया पर्सोनेल खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार केली गेल्याचे म्हटले आहे. या तत्वानुसार नोकरीसाठी कुणीही परीक्षा देऊ शकतो. मात्र, त्याची अंतिम निवड करतेवेळी तो रहिवासी कायद्याखाली त्या नोकरीस पात्र होतो का हे पहायचे असते असे म्हटले आहे.

CM Pramod Sawant and Girish Chodankar
Goa: नेत्रावळीची आर्थिक घडी विस्कटली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com