Goa Cabinet Reshuffle: नव्या वर्षात गोवा मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे सूचक वक्तव्य

Goa Cabinet Reshuffle: फेरबदल होण्याबाबत प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सूचक वक्तव्य केल्याने लवकरच याला मुहूर्त लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Goa Cabinet Reshuffle: नव्या वर्षात गोवा मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे सूचक वक्तव्य
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cabinet Reshuffle

पणजी: डिसेंबरच्या अखेरीस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. जवळपास अर्धा डझन मंत्री आणि नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी केल्या. लवकरच राज्यात मंत्रिमंडळात बदल होणार असे चित्र निर्माण झाले असताना वर्ष संपले तरी फेरबदल काही झाले नाहीत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नव्या वर्षात केलेल्या वक्तव्याने २०२५ मध्ये फेरबदलाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून फेरबदलाची चर्चा सुरु आहे. लोकसभा आणि नंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आल्याने फेरबदलावर तोडगा निघाला नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापनेला विलंब झाल्याने गोव्याचा निर्णय लांबणीवर पडला. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर गोव्यात फेरबदलाच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला. डिसेंबरमध्ये यासंबधित जोरदार घडमोडी घडल्या. याच काळात राज्यातील नेतृत्व बदलाची देखील चर्चा होऊ लागली.

Goa Cabinet Reshuffle: नव्या वर्षात गोवा मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे सूचक वक्तव्य
Saint Francis Xavier Exposition: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळ्याला 70 लाख भाविकांनी लावली हजेरी, आता उरले केवळ 4 दिवस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीन आमदारांसोबत चार्टरमधून दिल्ली गाठली होती. सावंत यांच्या या दिल्ली भेटीने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले. या भेटीनंतर पर्यटनमंत्री खंवटे यांनी आणि त्यापूर्वी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्लीत भेटीगाठी घेतल्या होत्या. वर्षा अखेरपर्यंत राज्यात फेरबदल होईल, अशी शक्यता असताना त्यानंतर कोणत्याही हालचाली दिसल्या नाहीत. दरम्यान, खुद्द प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी यावर्षी फेरबदल होतील, असे सूचक भाष्य केल्याने २०२५ मध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वाढली आहे.

Goa Cabinet Reshuffle: नव्या वर्षात गोवा मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे सूचक वक्तव्य
Goa Accident: गोव्यात नववर्ष साजरा करायला आले होते, अपघातात 2 वर्षांच्या मुलीला गमावलं; पेट्रोल पंपावर मनसून्न करणारी घटना

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा देखील झाल्या. परराज्यातून नेता आयात करुन राज्याचे नेतृत्व देण्याची शक्यता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारल्या आहेत. दरम्यान, फेरबदल होण्याबाबत प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सूचक वक्तव्य केल्याने लवकरच याला मुहूर्त लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com