IRCTC चे खास Goa Package आहे स्वस्त आणि अलिशान; भारत गौरव ट्रेनमधून घडणार प्रवास

जाणून पॅकेजविषयी सविस्तर
IRCTC Goa Package:
IRCTC Goa Package: Dainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Goa Package: रेल्वेची कंपनी असलेल्या IRCTC पर्यटकांसाठी नवनवीन टूर पॅकेज देत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळते आणि पर्यटकही विविध पर्यटनस्थळांना स्वस्तात भेट देऊ शकतात.

IRCTC टूर पॅकेजची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पर्यटकांना मोफत निवास आणि भोजन प्रदान करतात.

हे टूर पॅकेज मर्यादित कालावधीचे आहेत आणि या काळात पर्यटकांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मोफत दिले जाते आणि विश्रांतीसाठी चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाते.

आता IRCTC ने गोव्यासाठी स्वस्त आणि अतिशय आलिशान टूर पॅकेज आणले आहे. हे टूर पॅकेज IRCTC ने एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आणले आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

IRCTC Goa Package:
IFFI 2023: 'इफ्फी'त आज, सोमवारी बॉलीवुडचे 4 खलनायक लक्ष वेधून घेणार; विद्या बालनही उलगडणार प्रवास

किती दिवस-रात्रींसाठी?

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव गोवा स्पेशल आहे. हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत 11 हजार 750 रुपये आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटकांना गोव्याला भेट देता येणार आहे.

हे टूर पॅकेज तामिळनाडूतील तेनकासी येथून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही ओल्ड गोव्यातील चर्च, मंगेशी मंदिर, कोलवा बीच, आग्वाद किल्ला येथे भेट देण्यात येणार आहे. टूर पॅकेजमध्ये पर्यटक तामिळनाडूतून गोव्याला भेट देतील.

कधीपासून?

IRCTC चे हे टूर पॅकेज 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये 768 जागा आहेत. ज्यामध्ये इकॉनॉमी सीट्स 560 आणि आराम सीट्स 208 आहेत.

या टूर पॅकेजमध्ये चेंगलपट्टू, चेन्नई एग्मोर, चिदंबरम, दिंडीगुल, इरोड, जोलारपेट्टई, मायिलादुथुराई, पलक्कड, पोदानूर, राजापालयम, सालेम, शोरानूर जंक्शन, शिवकाशी, तांबरम, तेनकासी, विपुल्लुद्री, थंबारम, विरपुल्लुद्री आणि थंकासी या ठिकाणांहून पर्यटक बोर्डिंग आणि डिबोर्डिंगचा समावेश आहे.

रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज बुक करू शकतात.

IRCTC Goa Package:
IFFI 2023: सनी देओलच्या 'या' चित्रपटानंतर दोन फोन कॉल आले... एक अंडरवर्ल्डमधून आणि दुसरा 'मातोश्री'वरून...

पॅकेजचे भाडे

IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे बदलते. जर तुम्ही या टूर पॅकेजच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती भाडे 11,750 रुपये द्यावे लागतील. तर, आराम वर्गात तुम्हाला 19,950 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल.

इकॉनॉमी क्लासमधील 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांचे भाडे 11,050 रुपये आणि आराम वर्गातील 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांचे भाडे 19,150 रुपये ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com