Yoga Day: सरकारी कर्मचाऱ्यांना योगदिनी सक्तीची हजेरी, योगदिन उपक्रमात दोन लाख नागरिकांचा सहभाग अपेक्षित

International Yoga Day: रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही सरकारी कर्मचाऱ्यांना २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करावी लागणार आहेत.
 International Yoga Day
Yoga DayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही सरकारी कर्मचाऱ्यांना २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करावी लागणार आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही सरकारने या कार्यक्रमात सहभागी होण्याची सक्ती केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात या तयारीचा आढावा उच्चस्तरीय बैठकीत घेतला.

या बैठकीस क्रीडामंत्री रमेश तवडकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, क्रीडा सचिव संतोष सुखदेवे, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, खाण संचालक नारायण गाड, क्रीडा संचालक अजय गावडे आदींसह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 International Yoga Day
CM Fellowship Goa: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 20 जागा; तरुणांना शासनाच्या विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी राज्यभरात एक हजारहून अधिक ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संबंधित राज्यभरातील योगदिन उपक्रमात सुमारे दोन लाख नागरिक सहभागी होतील. योगदिन यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने व्यापक नियोजन केले असून सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील कार्यक्रमात अनिवार्यपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यंदाच्या योगदिनाची जागतिक संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी आहे. वाढत्या वयातही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात विविध ठिकाणी सामूहिक योग सत्रांचे आयोजन केले असून त्यासाठी प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे.

 International Yoga Day
PM Narendra Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्‍टेंबरमध्‍ये गोव्‍यात; विकास प्रकल्पांची होणार पायाभरणी, CM प्रमोद सावंतांची माहिती

योगदिन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना योग सत्रास उपस्थित राहून त्याची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सहभागी नागरिकांना ऑनलाईन प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

राज्यातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पंचायत क्षेत्रे, क्रीडा संकुले, सार्वजनिक मैदाने आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून योगदिन साजरा केला जाणार आहे. योगदिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 International Yoga Day
Chimbel Unity Mall: युनिटी मॉलवरून वाद पेटला! चिंबल ग्रामस्थांची आक्रमक भूमिका; सर्वेक्षण ढकलले पुढे

गिनिज विश्वविक्रमाचा संकल्प

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या एकाच वेळी होणाऱ्या ऑनलाईन योगसत्राच्या गिनिज विश्वविक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या उपक्रमामुळे भारताची योग परंपरा जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे अधोरेखित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

योगदिनाची ठळक वैशिष्ट्ये

राज्यात एक हजारहून अधिक ठिकाणी योगसत्रे

सुमारे दोन लाख नागरिकांच्या सहभागाचे लक्ष्य

सरकारी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

सहभागींसाठी ऑनलाईन प्रमाणपत्राची सुविधा

गिनिज विश्वविक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

यंदाची संकल्पना : ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com