Goa Cricket Association गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) धारगळ येथील नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर वेगाने सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष विपुल फडके यांनी रविवारी आमसभेनंतर व्यक्त केला.
धारगळ येथे स्टेडियम बांधकामासाठी बहुतांश सारी मंजुरीपत्रे मिळाली आहेत. फक्त भूसपाटीकरण आणि जोडरस्त्यास परवानगी मिळणे बाकी असल्याचे विपुल यांनी नमूद केले. धारगळ येथेच नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यावर जीसीए आमसभेने रविवारी शिक्कामोर्तब केले.
त्यामुळे स्टेडियम धारगळ, की डिचोलीत हा प्रश्न अखेर निकालात निघाला. त्याचवेळी, डिचोली तालुक्यातील मावळिंगे येथे क्रिकेट विकासासाठी क्रिकेट मैदान निर्मितीची सूचना आमसभेत सदस्यांनी केली.
जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी सांगितले, की ``स्टेडियमचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावी अशी आग्रही सूचना आमसभेत क्लब प्रतिनिधींनी केली.
कामास विलंब करू नका, तसेच धारगळ, की डिचोली येथे स्टेडियम याबाबत संभ्रम निर्माण करू नका असेही क्लबांनी बजावले.`` आमसभेला जीसीए सचिव रोहन गावस देसाई, खजिनदार दया पागी, तसेच अन्य पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
केतन भाटीकर जीसीएतून बडतर्फ
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात वावरणारे, संघटनेला बदनाम करणारे डॉ. केतन भाटीकर यांना संघटनेत का ठेवतात अशी विचारणा क्लबांनी आमसभेत केली. त्यानंतर त्यांना संघटनेच्या आजीव सदस्यपदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय आमसभेत बहुमताने झाल्याची माहिती विपुल यांनी दिली.
भाटीकर यांच्या बडतर्फीचा कालावधी किती असेल हे ठरविण्यात येईल. जीसीए वैद्यकीय संचालकपदावरुनही भाटीकर हटविण्यात आल्याचे विपुल यांनी सांगितले. या ठरावावर भाटीकर यांच्या बाजूने फक्त चार क्लब राहिले.
2018 मधील जीसीएल स्पर्धेतील बक्षीस रक्कम भाटीकर यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी सूचना आमसभेत क्लबनी जीसीए व्यवस्थापकीय समितीला केली.
आमसभेतील इतर निर्णय
संलग्न क्लब अनुदानात होणार वाढ
सर्व तालुक्यात क्रिकेट सुविधा निर्मिती
महिला क्रिकेटच्या विकासास प्राधान्य
महिलांसाठी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
निवड समिती नियुक्त-
सीनियर पुरुष: धीरज नार्वेकर, साहिल धुरी, सूरज कामत, रामानंद नाटेकर, इलियास नारु.
ज्युनियर पुरुष: अनुप कोळंबकर, सागर गोसावी, संतोष किटलेकर, महेंद्र नाईक, समीर चोडणकर.
महिला: संगीता माझरेकर, श्रद्धा राजाध्यक्ष, जान्हवी शेट, सुनिता खरडे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.