Goa Electricity: विजेचा धक्का लागून लाइनमन गंभीररित्या जखमी

ऑक्सिजन रिसॉर्टच्या कामावेळी घडला प्रकार
Electricity
ElectricityDainik Gomantak

Goa Electricity गोवा इलेक्ट्रिसिटी लाइनमन शॉक लागून गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडलीय. मोरजी येथील ऑक्सिजन रिसॉर्टच्या मेन्टेनन्सचे काम करत असताना मीटरिंग क्यूबिकलमध्ये 11 केव्ही लाईनच्या संपर्कात आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या रिसॉर्टच्या देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार क्युबिकल मीटरिंग बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने वीज विभागाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान हे काम करत असताना मेंटेनन्स इंजिनीअरने लाईनमनला अॅक्टिव्ह इनकमिंगच्या 11KV वीज पुरवठ्याबाबत अगोदर कल्पना दिली होती.

Electricity
Anjuna: 'गोवा इज नॉट सेफ', तलवार, चाकूने हल्ला करत केले रक्तबंबाळ; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

मात्र इंजिनीअरच्या सूचनेकडे लाईनमनने दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीत तो लाईन तपासण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला. या धक्क्याने सदर लाईनमन गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com