Anjuna: 'गोवा इज नॉट सेफ', तलवार, चाकूने हल्ला करत केले रक्तबंबाळ; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

हणजूण येथे पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर तलवार आणि चाकूच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला
Anjuna
AnjunaDainik Gomantak
Published on
Updated on

हणजूण येथे पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर तलवार आणि चाकूच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करत त्यांना रक्तबंबाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या पर्यटकाने स्वत: या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून, गोवा इज नॉट सेफ असे म्हटले आहे. याशिवाय त्याने राज्याचे पोलिस, हॉटेल यांच्याबाबत देखील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जतिन शर्मा याने याबाबत इन्स्टाग्रामवर आपल्या अधिकृत हँडलवरून घटनेचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर काही लोक तलवार आणि चाकूने जोरदार प्रहार करताना दिसत आहेत. या हल्ल्यात तो तरूण गंभीररित्या जखमी झाल्याने रक्तबंबाळ झाल्याचे दिसत आहे. याचवेळी त्याची बहीण मोठ्याने रडताना आणि भावाला सावरताना दिसत आहे.

याशिवाय अजून एक वयस्कर पुरूष दिसत असून, ते या त्याचे वडिल असावेत. यात एक महिला वडिलांना मधुमेहाचा त्रास आहे असेही म्हणाताना दिसत आहे. त्यांना देखील यात मोठ्या प्रमाणावर जखम झाली आहे. असे व्हिडिओत दिसत आहे.

Jatin Sharma Instagram
Jatin Sharma InstagramInstagram
Anjuna
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची कर्नाटकमध्ये भाजपसाठी 'विजय संकल्प यात्रा', 150 हून अधिक जागांचा दावा

दरम्यान, या घटनेची माहिती देखील जतिन शर्मा यांनी व्हिडिओ शेअर करताना दिली आहे. "आम्ही अलिकडेच गोव्यात होतो. या रिसॉर्टवरती आम्ही 5 ते 6 मार्च या कालावधीत थांबणार होतो. तेथे आमच्यावर काही स्थानिक गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी याप्रकरणी कलम 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल न करता, कलम 324 (घातक शस्त्रांनी इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे."

"पोलिसांनी या घटनेप्रकरणी चार हल्लेखोरांना अटक केली आहे. पण, पोलिसांनी 307 न दाखल करता 324 दाखल केले आहे. एफआयआरमध्ये संशयितांची नावे नाहीत. स्थानिक गुंडांच्या मदतीसाठी 307 चे प्रकरण 324 मध्ये बदलले." असे जतिन यांनी म्हटले आहे.

"हणजूण येथील स्पॅझिओ लेझर रिसॉर्टला भेट देऊ नका. हल्लेखोरांपैकी रोशन नावाचा एक हॉटेलचा कर्मचारी होता." असे जतिन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com