गुळेलीत ‘आरजी’चा प्रभाव: शेळ-मेळावलीत विश्‍‍वजीत राणेंना निसटते मताधिक्‍क्‍य

झळ आंदोलनाची, तरीही सरशी भाजपचीच
Vishwajeet Rane News, RG News Updates, Guleli News, Goa Political News Updates
Vishwajeet Rane News, RG News Updates, Guleli News, Goa Political News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: वादग्रस्‍त आयआयटी प्रकल्‍पामुळे राज्य सरकारविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान कसे असेल, याबाबत बरीच उत्सुकता होती. सरकार पक्षाचे उमेदवार असलेले आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरोधात येथे कौल असेल अशीही अपेक्षा होती व ती काहीअंशी खरीही ठरली. या पंचायत क्षेत्रातील बहुतेक मते रिव्होल्युशनरी गोवन्सकडे (आरजी) वळली. आयआयटीविरोधी आंदोलनात मनोज परब यांनी घेतलेल्या पुढाकाराची पावती स्थानिक मतदारांनी त्‍यांना दिल्याचे दिसते. (Vishwajeet Rane News)

Vishwajeet Rane News, RG News Updates, Guleli News, Goa Political News Updates
मगोपचे भाजप गटनेत्यांना सडेतोड उत्तर

गेली दोन वर्षे गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मेळावली आयआयटी आंदोलन बरेच गाजले होते. स्‍थानिकांनी भाजप सरकारविरोधात टाहो फोडत हा प्रकल्‍प रद्द करण्यास सरकारला भाग पाडले होते. त्या आंदोलनावेळी झालेल्या वादावादीमुळे अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते, जे आजही मागे घेतलेले नाहीत. सरकारविरोधातील तीव्र रोष पाहता भाजपला प्रचंड हानी होईल असे भाकीत वर्तविण्यात येत होते. मात्र ते तेवढे खरे ठरले नाही. (Goa Political News Updates)

अवघे 32 मतांचे मताधिक्‍क्य

गुळेली पंचायत क्षेत्रातील बूथ क्रमांक 29 या मैंगीणे, धडा, शेळ-मेळावली या भागातील मतदानकेंद्रावर आरजीला 286 तर भाजपला 158 मते मिळाली. अन्य उमेदवारांना मिळून 140 मते प्राप्‍त झाली. 16 मते नोटाच्या पारड्यात पडली. या केंद्रांवर आरजीचे मनोज परब यांनी पहिले स्थान घेतले. मुरमुणे-पैकुळ या भागासाठी असलेल्या क्र. 30 च्या बूथवर भाजपला 256 तर आरजीला 249 मते मिळाली.

येथे नाममात्र का होईना, विश्वजीत राणेंना आघाडी घेतली. बूथ क्रमांक 31 अर्थांत गुळेली, कणकिरे या भागासाठी असलेल्‍या केंद्रावर भाजपला 346 आणि आरजीला 150 मते मिळाली. बूथ क्रमांक 32 या धामशे भागातील केंद्रावर पुन्हा आरजीला घसघशीत मताधिक्‍क्य प्राप्त झाले. येथे आरजीला 192 तर भाजपला 149 मते मिळाली. एकूणच गुळेली पंचायत क्षेत्रात भाजपला 909 तर आरजीला 877 मते प्राप्त झाली. म्‍हणजेच राणे यांना जेमतेम 32 मते जास्‍त मिळाली.

Vishwajeet Rane News, RG News Updates, Guleli News, Goa Political News Updates
हिंसाचार केल्याप्रकरणी हनुमंत परबांनी केली DYSP अन् PSI ची तक्रार

नोकरीची नियुक्तिपत्रे ठरली टर्निंग पाईंट!

गुळेली पंचायत क्षेत्रातील अनेकांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आरोग्य खात्यात नोकरीची नियुक्तिपत्रे देण्‍यात आली होती. मेळावली आयआयटी पंचक्रोशी भागातील नागरिकांनाही ही पत्रे मिळाली. त्याचाच परिणाम म्हणून भाजपने ऐनवेळी बाजी मारल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. आयआयटी आंदोलनाची धग आजही लोकांच्या मनात आहे. कंपनीला दिलेली जमीन सरकारने अजूनही ताब्यात घेतलेली नाही किंवा लोकांवरील गुन्हेही मागे घेतलेले नाहीत. असे असतानाही गुळेली पंचायत क्षेत्रात भाजपला आघाडी मिळण्यामागे नोकऱ्यांची पत्रे तर नसावीत ना, असा खुलेआम सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com