Sanguem IIT: शेती वाचवण्यासाठी नव्हे जमीन विक्रीसाठी काहींचा आयआयटीला विरोध; आमदार फळदेसाई यांनी साधला निशाणा

गोवा सरकार आयआयटी प्रकल्प सांगे येथेच होणार
Sanguem IIT
Sanguem IITDainik Gomantak

गोवा राज्यात सांगे आयआयटी प्रकल्प विरोधावरुन वातावरण तापल्याची स्थिती राज्यात आहे. स्थानिकांनी आमच्या जमिनी देणार नाही, अशी भुमिका घेतली आहे. तर गोवा सरकार हा प्रकल्प सांगे येथेच होणार असल्याचे म्हणत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा आमदार सुभाष फळदेसाई यांनी विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

(MLA Subhash Phaldesai has said that Goa government IIT project will be done at Sanguem)

आमदार सुभाष फळदेसाई आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, शेती वाचवण्यासाठी नव्हे तर जमीन विक्रीसाठी काहींचा आयआयटीला विरोध आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच पुन्हा एकदा आयआयटी प्रकल्प सांगे येथेच होणार असल्याचे म्हटले आहे.

Sanguem IIT
Goa Beaches: समुद्र किनाऱ्यांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायती सरसावल्या; आता पर्यटन पोलिसांची फौज...

याबरोबरच सांगे आयआयटी प्रकल्पाच्या प्रस्तावित शेतीवर कोण शेती करताना दिसतो आहे. कोण शेतात मशागत करताना दिसत आहेत. तसेच मशिन घालत शेती करत असल्याचे दाखवतात. ते केवळ आणि केवळ फोटो पुरतेसाठीचे उद्योग असल्याचे म्हटले आहे.

Sanguem IIT
9th world Ayurveda Congress 2022: जागतिक आयुर्वेद परिषदेला थाटात सुरुवात; मुख्यमंत्र्यांची गोमंतकीयांसाठी मोठी घोषणा

यावेळी त्यांनी शेतीचा दावा करणाऱ्यांना थेट आव्हान देत आपण कोणाचेही कृषी कार्ड दाखवा. असे म्हटले. जमीन तुमची म्हणता तर तुमच्याकडे एखादे कृषी कार्ड दाखवण्यासाठी नाही. यावरुनच सत्य सर्वांसमोर उघड होत असल्याचे ते म्हणाले. तसेच काहींनी ही जमीन आमची आहे. असे सांगत राजस्थानच्या व्यापाऱ्यांशी पैशाचा व्यवहार केला आहे. मात्र ही जमीन सरकारी मालकीची आहे. त्यामुळे ही सरळ सरळ फसवणूक असल्याचे फळदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com