Pandit Prabhakar Karekar Death: गोव्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित कारेकर यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Vocalist Prabhakar Karekar Passed Away: प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले
 Prabhakar Karekar Death
Prabhakar Karekar Death Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे बुधवारी (१२ फेब्रुवारी) रोजी निधन झाले. पंडित प्रभाकर कारेकर याचा जन्म गोव्याचा. त्यांच्या परिवाराने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पंडित कारेकर यांना आजाराने ग्रासलं होतं आणि याच आजाराशी दोनहात करताना त्यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मधल्या निवास्थानी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पंडित कारेकर यांच्या पार्थिवर शरीरावर अंतिम संस्कार केले जातील.

गोव्याचे प्रभाकर कारेकर

हिंदुस्थानी शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर यांचा जन्म वर्ष १९४४ मध्ये गोव्यात झाला होता. पंडित सुरेश हळडणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी. आर व्यास हे त्यांचे गुरु आहेत.

 Prabhakar Karekar Death
Classical Music Festivals : कुडणेत उद्या पंडित श्रीपादबुवा माडये शास्त्रीय संगीत महोत्सव

मराठी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गाण्यांपैकी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल या गाण्यांसाठी पंडितजींच्या वडिलांची ख्याती होती. पंडित कारेकर यांना त्यांच्या कार्यासाठी गोमंत विभूषण पुरस्कार,संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे वेगवेगळे सन्मान प्राप्त आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली:

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर पोस्ट करत ते म्हणतात कि गोव्यात जन्मलेल्या या गायकाने गोव्यात शास्त्रीय संगीत रुजावं म्हणून मेहनत घेतली. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या स्मृती कायम राहतील. या कठीण काळात त्यांच्या परिवाराला, चाहत्यांना आणि विद्यार्थीवर्गाला बळ मिळो आणि देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com