Goa Politics: ‘USA’त भारतीयांचा सन्मान राखण्यात सरकार अपयशी, अमित पाटकरांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

Amit Patkar: भाजप सरकार जागतिक स्तरावर आपल्या नागरिकांच्या सन्मानाचे व अधिकारांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Patkar India US deportation issue

पणजी: अमेरिका सरकारने १०४ भारतीयांना हातापायात साखळदंडाने बांधून अन्याय्यपणे हद्दपार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना भेटतात, त्यांचा प्रचार करतात. मात्र, ते भारतीयांचा सन्मान राखू शकले नाहीत. केंद्र भाजप सरकार जागतिक स्तरावर आपल्या नागरिकांच्या सन्मानाचे व अधिकारांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

याप्रसंगी आमदार कार्लोस फेरेरा, गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश नडार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. चार दिवसांपूर्वी अमेरिका सरकारने तेथे बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना परत पाठविण्यास सुरुवात केली आहे.

१०४ भारतीयांना ज्या पद्धतीने भारतात पाठविण्यात आले, ही बाब भारतीयांसाठी लज्जास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांचा सन्मान राखू न शकल्याच्या निषेधार्थ पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन केले. याप्रसंगी त्यांनी भाजप सरकारच्या अपयशावर टीका केली.

Amit Patkar
Goa AAP: दिल्लीतील पराभवानंतर 'आप' बॅकफुटवर; गोव्यात काँग्रेससोबत आघाडी? नेत्याचं सूचक विधान

ते म्हणाले, देशातील युवकांना जर नोकऱ्या मिळाल्या असत्या तर ते बेकायदेशीरपणे दुसऱ्या देशात घुसले नसते. दुसऱ्या देशांमध्ये जाण्याची वेळ ही भाजपने आणली आहे. देशात नोकऱ्या मिळत नाहीत, दुसऱ्या देशात गेलेले हे उच्चशिक्षित आहेत.

बेकायदा दुसऱ्या देशात जाणे गुन्हा असला तरी येथील सरकारने जर त्यांना आवश्यक त्या नोकऱ्या उपलब्ध केल्या असत्या, तर ते या मार्गाचा अवलंब करीत दुसऱ्या देशांत गेलेच नसते. गुन्हेगारांप्रमाणे १०४ भारतीयांना पाठविण्यात आले. परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी २००९ पासून भारतीयांना परत पाठविले जात असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी आपल्या मुलाला साखळदंड बांधून पाठविल्याचे सहन केले असते का? असा सवाल केला.

Amit Patkar
Goa Politics: '..हा तर सामान्य जनतेचा विजय'! दिल्ली जिंकल्यानंतर गोव्यात जल्लोष, 2027 मध्ये 27 जागांचा पुनरुच्चार

ट्रम्पशी चांगल्या संबंधांचा दिखावा!

आमदार फेरेरा म्हणाले, परराष्ट्र व्यवहार खात्याने अमेरिकेने भारतीयांना पाठविण्यासंबंधी माहिती उपलब्ध होती, तर त्यांनी तत्काळ पावले उचलायला हवी. मानवतेचे हक्क अमेरिकेत पाळले गेले नाहीत. भारतातून देश सोडून का जात आहेत? याचा विचार करावा. अमेरिका व इतर देशात जे बेक लोक गेले आहेत, त्यांना जर भारतात आणायचे झाल्यास त्यांना सन्मानाने आणायला हवे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबध चांगले असल्याचा दिखावा केला जात आहे. अमेरिकेने बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना परत भारतात पाठविण्याचे सर्वात पहिले पाऊल उचलले, इतर देशांबाबत तो प्रकार घडला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com