CM चं मत तेच माझं मत; म्हादई, डबल ट्रॅकिंग, कोळसा, मेगा प्रोजक्टवर पल्लवी धेंपे यांनी बोलणं टाळलं

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे यांनी सीएमचे मत तेच माझे मत असे म्हणत प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळलं.
Pallavi Dempo South Goa BJP Candidate
Pallavi Dempo South Goa BJP CandidateDainik Gomantak

गोव्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी (दि.16) लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. दक्षिणेत पल्लवी धेंपे जोरदार प्रचार करत असून, मंगळवारी त्यांना काही पत्रकारांनी घेरत राज्यातील महत्वाच्या मुद्यांवर प्रश्न विचारले.

पल्लवी धेंपे यांनी सीएमचे मत तेच माझे मत असे म्हणत प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळलं.

पल्लवी धेंपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. पर्यावरण आणि विकासकामे हातात हात घालून पुढे जायला हवीत. जनतेची सेवा करण्यासाठी मी अहोरात्र काम करेन, असे धेंपे म्हणाल्या.

धेंपे यांना यावेळी म्हादईबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी हा मुद्दा न्यायालयात असून, भाष्य करने टाळलं. तसेच, यावेळी त्यांना रेल्वे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक, मेगा प्रकल्पांबाबत प्रश्न विचारण्यात आले. पण, पल्लवी धेंपे यांनी याबाबत उत्तर न देता मुख्यमंत्री सावंत यांचे प्रकल्पाबाबत जे मत आहे तेच माझे मत, असे उत्तर दिले.

दक्षिणेत रोजगाराच्या संधी कमी झाल्याबाबत विचारणा होते, अशीही माहिती धेंपे यांनी यावेळी दिली. यावेळी त्याच्यासोबत मंत्री रवी नाईक आणि सुदिन ढवळीकर उपस्थित होते.

Pallavi Dempo South Goa BJP Candidate
Goa Murder Case: लव्ह ट्रँगल, धोका आणि खून! पिळर्ण-पर्वरीत युपीच्या तरुणाची हत्या, पाचजण ताब्यात

समाजमाध्यमांवर उमटल्या प्रतिक्रिया

पल्लवी धेंपे यांनी गोव्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे असणाऱ्या प्रश्नावर भाष्य करणे टाळल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमांवरून टीका केली जात आहे.

'पाहा गोव्याचे उमेदवार कसे बोलत आहेत? आणि गोव्याचे मुद्दे केंद्रात उपस्थित केले जातील अशी आम्ही आपेक्षा करतोय,' अशी एका एक्स युझरने प्रतिक्रिया दिली आहे.

दुसऱ्या एका युझरने त्या प्रश्नाला उत्तर देखील देत नाहीयेत, त्यांना खासदार होऊन गोव्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे, असे प्रतिक्रिया दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com