Goa Accident Death: गोव्यात 108 दिवसात 101 अपघात बळी; बाळ्ळीत बसच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

Goa Accident Death: या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांकडून पुढील तपास केला जात असून बसचालकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.
Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak

Goa Accident Death

भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्‍याने बाळ्ळी येथील महामार्गावर समोरुन जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्‍याने एकाचा तत्‍काळ मृत्‍यू झाला. मागच्‍या साडेतीन महिन्‍यातील आजचा हा बळी १०१ वा असून गोव्‍यातील वाढलेले अपघाती मृत्‍यू ही चिंतेची बाब बनली आहे.

या अपघातात ठार झालेल्‍या दुचाकी चालकाचे नाव एकनाथ यशवंत नाईक (६०, रा. बेतूल) असे असून बेतूलचे माजी सरपंच पुरुषोत्तम नाईक़ यांचे ते भाऊ असल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांकडून पुढील तपास केला जात असून बसचालकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक बंगळुरु येथील खासगी बस बाळ्ळी इस्पितळ परिसरातील महामार्गावर आली असता बसचालक दुर्गाप्पा कारबोंडा (३७, रा. हावेरी कर्नाटक) याचा बसवरील ताबा सुटला.

बस वेगात असल्याने समोरुन जाणाऱ्या दुचाकीला बसची धडक बसली व यात दुचाकीचालक एकनाथ यशवंत नाईक या बेतूल येथील नागरिकाला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असल्याने नाईक यांना बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे समजताच बेतूल येथील नागरिक तत्काळ बाळ्ळी येथे आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत एकनाथ नाईक हे आपल्या भाऊ पुरुषोत्तम यांना बाळ्ळी येथील इस्पितळात डायलेसिससाठी घेऊन आले होते. आपल्‍या भावाला इस्‍पितळामध्‍ये ठेवून परतताना हा अपघात घडला.

Goa Accident Death
CM चं मत तेच माझं मत; म्हादई, डबल ट्रॅकिंग, कोळसा, मेगा प्रोजक्टवर पल्लवी धेंपे यांनी बोलणं टाळलं

कुंकळ्ळी पोलिसांकडून या अपघातप्रकरणी गुन्हा नोंद केलेला असून बसचालक दुर्गाप्पा कारबोंडा (रा. हावेरी कर्नाटक) याला ताब्यात घेतलेले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक डायगो ग्रासीयस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

खासगी बसच्या वेगावर निर्बंध नसतात. बाळ्ळी इस्पितळानजीकच्या रस्त्यावर गतिरोधक किंवा रम्बलर उभारण्यात आलेले नसल्याने गाड्या वेगाने जातात. बाळ्ळी इस्पितळात मृतदेह ठेवण्यात आलेला असून इस्पितळात शववाहिका उपलब्ध नाही.

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खासगी शववाहिनी आणून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यास सांगण्यात येते. ही शोकांतिका असून राज्य सरकारने या गोष्टींकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com