Pernem: कूळ मुंडकारांसाठी पेडणेत स्वतंत्र मामलेदार

Pernem: मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची आमदार जीत आरोलकर यांची माहिती
Jit Arolkar
Jit ArolkarDainik Gomantak
Published on
Updated on

Pernem: पेडण्यातील कूळ मुंडकार खटले वेगाने निकाली काढण्यासाठी वेगळ्या मामलेदारांची नियुक्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधणारे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले.

Jit Arolkar
Mahadayi River: म्हादई नदीचा अभ्यास गरजेचा

पेडणे विभागीय नियोजन आराखडा सरकारकडून रद्द करवून घेतल्यानंतर आरोलकर यांनी कुळ मुंडकारांचा प्रश्न हाती घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर त्यांनी सांगितले, की पेडण्यातील कुळ मुंडकारांना न्याय मिळायला हवा. मोपा येथे विमानतळ झाल्यानंतर देशभरातील गुंतवणूकदार पेडण्यात घुसले आहेत.

जमीनदार व गुंतवणूकदार परस्पर करार करतात. मालमत्तांची विक्री होते. यात कुळे, मुंडकार बेदखल राहतात. भूखंडात राहणाऱ्याच्या न कळत भूखंडाची विक्री होते. तेथे राहणारा न्याय मागू शकत नाही. त्याला तो मार्गही माहीत नसतो. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी जागृती सुरू केली आहे. कार्यालयात चार वकील नियुक्त केले आहेत. पिढ्यानपिढ्या राहत असलेल्यांच्या नावावर जमीन नसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. आजवर त्या जमिनीवर दावे न केलेल्यांनी ते दावे करावेत यासाठी हे वकील मदत करतील.

Jit Arolkar
Goa Farming: म्हार्दोळच्या ‘जाया’ संरक्षित करा

काजूची झाडे अनेकांकडे आहेत पण जमीन नावावर नाही असेही प्रकार आहेत. मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे कूळ विषयक खटले प्रलंबित राहतात. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. 200-300 वर्षे जुनी घरे आहेत पण जमिनीची मालकी घर मालकाकडे नाही. बाहेरून येणारे गुंतवणूकदार भूखंड घरासह विकत घेतात. प्रत्यक्षात जमीन मालक त्या घरात राहत नाही.

जमिनीची विक्री झाल्यानंतर घरात राहणाऱ्यांना इतरत्र हलवले जात आहे. याचे पुरावेही मी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. आक्षेप असतानाही एका दिवसात जमीन मालकी बदल नोंदवण्यात आले आहेत.

त्याबाबत कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मोरजीत या पद्धतीने राहणाऱ्याला अशा प्रकारांमुळे गाव सोडून तुये येथे दिलेल्या जमिनीवर राहण्याची वेळ आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

न्याय देण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता कुळ-मुंडकारांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कसणाऱ्याला जमीन आणि राहणाऱ्याला घराखालील जमिनीची मालकी दिली गेली पाहिजे. शक्य तितक्या लवकर असे करण्यासाठी सरकार पावले टाकेल. आमदार जीत आरोलकर यांनी हा विषय आज निदर्शनास आणून दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com