Goa Farming: म्हार्दोळच्या ‘जाया’ संरक्षित करा

Goa Farming: सरदेसाई: नाईक फुलकार समाजाला कायदेशीर हक्क द्या
Goa Farming
Goa FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Farming: म्हार्दोळच्या जाया (जाई) शेतीला वारंवार आगी लावल्या जात आहेत. यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. या जमिनीचे भाटकर या जमिनीवर मोठमोठ्या इमारती उभारू पाहत आहेत.

Goa Farming
Konkani Language: कोकणीतूनच व्यवहार करा, एम. व्यंकय्या नायडू

यासाठी कृषी आणि नगर नियोजन खात्याच्या नियमानुसार या नाईक फुलकार समाजाला जमिनीचे कायदेशीर हक्क देऊन त्यांचा फुले विणण्याचा व्यवसाय ''पारंपरिक वारसा व्यवसाय'' म्हणून संरक्षित करावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी या समाजाचे अध्यक्ष प्रताप नाईक, कृष्णा नाईक, यशवंत नाईक, महेंद्र नाईक, दिलीप नाईक, कालिदास नायक उपस्थित होते.

Goa Farming
54th IFFI Goa: 54 व्या ‘इफ्फी’ची जोरदार तयारी सुरू ‘सुकाणू समिती’ ची आठवड्याभरात बैठक

सरदेसाई म्हणाले, म्हार्दोळ येथील हा नाईक फुलकार समाज गेली 200 वर्ष या जागी आपला पारंपरिक जाया लागवडीचा व्यवसाय करतात. सुमारे 1 लाख स्क्वे. मी. जमिनीवर हा व्यवसाय पसरलेला आहे. मात्र या समाजातील नागरिकांकडे या जमिनीचे कायदेशीर दस्तऐवज व कागदपत्रे नाहीत.

तीन महिने हंगामी व्यवसाय

जायांची फुले हा केवळ तीन महिन्यांचा हंगामी व्यवसाय असून 60 कुटुंबे या व्यवसायावर आपले पोट भरतात. गावच्या महालसा नारायणी मंदिरामध्ये या समाजाने 110 वी जायांची पूजा अर्पण केली. याचा अर्थ असा की हा समाज गोवा मुक्तीपूर्वीपासून हा व्यवसाय करत आहे. यासाठी हा संपूर्ण परिसर कृषी जमीन म्हणून अधिसूचित करून संरक्षित केला पाहिजे. असेही सरदेसाई म्हणाले.

जायांकरिता 'जीआय' मिळवा

सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्याच्या वतीने इथल्या प्रसिद्ध जायांच्या फुलांना प्रादेशिक मानांकन (जीआय) मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसा मानांकन मिळाल्यास हा व्यवसाय टिकण्यास मदत होईल. आणि तिच्या उत्पन्न आणि इतर बाबी कायदेशीर बनण्यास मदत होईल.

समाजाची ओबीसीमध्ये गणना व्हावी

सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच पद्धतीने नाईक फुलकार समाजाला ओबीसी मध्ये त्यांच्या पारंपरिक व्यवसायानुसार इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) मध्ये समाविष्ट करून त्यांचा व्यवसाय अधिसूचित करावा. आणि ओबीसी प्रमाणे त्यांनाही आरक्षण आणि इतर सेवा सुविधा द्याव्यात यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. असेही सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com