Independence Day: कुमार यांच्यासह चौघांना राष्ट्रपती पदक

अग्नीशमन दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांना उत्कृष्ट सेवा पदक पदक जाहीर झाले आहे.
राष्ट्रपती पदक
राष्ट्रपती पदक Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोलिस महानिरीक्षक राजेश कुमार (Indian Police Service) पोलिस उपअधीक्षक किरण पोडवाल यांना आज राष्ट्रपती पोलिस पदक (Presidential Police Medal) जाहीर झाले. केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे राज्य प्रमुख अरविंदकुमार नायर यांनाही राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. अग्नीशमन दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांना उत्कृष्ट सेवा पदक तर मूळ खोलपे साळ येथील पण सध्या दिल्लीत स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये वरिष्ठ सुरक्षा साहाय्यक असलेले महेश अडेलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

पोडवाल हे राज्य पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून २६ जुलै १९९० रोजी रुजू झाले. अमली पदार्थ विरोधी पथकात काम करताना त्यांनी सरकारकडून अनेक प्रशस्तीपत्रे व बक्षिसे चांगल्या कामगिरीसाठी मिळवली आहेत. २००२ मध्ये खात्याचा फिंगर प्रिंट ब्युरो स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मे २०१५ मध्ये त्यांना उपअधीक्षकपदी बढती मिळाली आहे. ३१ वर्षांच्या सेवेत त्यांनी ४० प्रशस्तीपत्रे आणि ३२ रोख बक्षिसे मिळवली आहेत.

राष्ट्रपती पदक
Independence Day: डिचोलीत स्वातंत्र्याचा जयजयकार; मान्यवरांचा सत्कार

राजेश कुमार पोलिस सेवेत १९८९ मध्ये आले. दिल्ली पोलिसांत त्यांनी विविध पदांवर आजवर काम केले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून २०१८ मध्ये ते गोव्यात रुजू झाले आणि यंदा १ जानेवारीला त्यांना महानिरीक्षकपदी बढती मिळाली आहे.

श्रीकृष्ण पर्रीकर यांना उत्कृष्ट सेवा पदक

श्रीकृष्ण पर्रीकर हे अग्नीशमन दलात १९९६ मध्ये फायरमन पदावर रुजू झाले. २०१० मध्ये सब ऑफिसर पदावर बढती मिळाली. २०१५ पासून ते स्टेशन फायर ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. त्यांना २०१५ मध्ये मुख्यमंत्री शौर्य पदक प्राप्त झाले आहे. काणकोणमध्ये कोसळलेल्या रुबी रेसिडेन्सी इमारतीत अडकेल्यांना वाचवण्यात ते आघाडीवर होते.

राष्ट्रपती पदक
अखेर गोव्यातील सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com