Mormugao: मुरगावात डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांत वाढ; सप्टेंबरमध्ये आढळले 350 रुग्ण

दोन महिन्यांत ७४० लोकांना लागण
Dengue Cases Rise
Dengue Cases RiseDainik Gomantak
Published on
Updated on

Mormugao Dengue Cases: मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.

ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळण्याची संख्या कमी असली तरी सप्टेंबरमध्येही मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळून आले आहेत.

चिखली उपजिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात लोकांची डेंग्यूबाबत केलेल्या ''एनएस१'' तपासणीत ३५० लोकांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे उघड झाले आहे. मागच्या दोन महिन्यांत या भागात ७४० एवढांची नोंद झाली आहे.

ऑगष्टमध्ये वास्को शहर, दाबोळी, कुठ्ठाळी आणि इतर भागांत मिळून ३९० च्या आसपास रुग्णांची नोंद झाली होती. आतापर्यंत सुमारे ७४० रुग्णांची नोंद झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dengue Cases Rise
Goa Farming News: पावसामुळे भातशेती झाली आडवी!

वास्को अर्बन हेल्थ सेंटरमध्ये वाडे आणि नवेवाडे परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाल्याची नोंद आहे. सडा, बायणा, आदर्श नगर आणि इतर परिसरातील रुग्णांची नोंदही लक्षणीय आहे.

ऑगस्टमध्ये बायणा परिसरात रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली होती. कुठ्ठाळी मतदारसंघात झुआरीनगरमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

चारही मतदारसंघात रुग्ण...

डेंग्यू झालेले रुग्ण वाढत असल्याने लोकांत तो चिंतेचा विषय बनला आहे. कुठ्ठाळी, वास्को, दाबोळी आणि मुरगाव या चारही मतदारसंघात डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळले आहेत.

वाडे, नवेवाडे, झुआरीनगर, खारीवाडा, बायणा इत्यादी भागातून सप्टेंबर महिन्यात इतर भागापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याची माहिती चिखली उपजिल्हा इस्पितळ आणि वास्को शहरी आरोग्य केंद्रातील सूत्रांकडून मिळाली.

तसेच सडा, मांगोरहील, आदर्शनगर इत्यादी भागातून किरकोळ प्रमाणात डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली.

संख्या वाढण्याची भीती

सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले असून काहींवर सध्या उपचार सुरू आहेत. तर काही रुग्ण घरी परतले आहेत. सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

चिखल आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी ही सरकारी इस्पितळांमधील आहे.

मात्र, वास्को शहरातील अनेक खासगी रुग्णालयात सुद्धा डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. त्यामुळे ही संख्या वाढून एक हजार पेक्षा अधिक सुद्धा होऊ शकते.

उपाययोजना सुरू

दरम्यान, डेंग्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्र, मुरगाव नगरपालिका आणि इतर संबंधित आस्थापने विविध पावले उचलीत असल्याची माहीती मिळाली. त्यासाठी विविध भागात औषधांची फवारणी करणे, पाणी साचून राहणार नाही, यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे.

Dengue Cases Rise
New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्‍या उर्वरित कामाला गती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com