Goa Farming News: पावसामुळे भातशेती झाली आडवी!

Goa Farming News: शेतकरी चिंतेत : हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्‍याची सतावतेय भीती
Goa Farming News
Goa Farming NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Farming News: गेल्‍या काही दिवसांपासून पडत असलेल्‍या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

काही ठिकाणी भातशेती आडवी झाली असून, असाच पाऊस पडला तर ती कुजून जाण्‍याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

Goa Farming News
New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्‍या उर्वरित कामाला गती

यंदाच्‍या मोसमात चांगला पाऊस झाल्यामुळे पीक चांगले आले आहे. परंतु मागील आठवडाभरापासून झोडपून काढणाऱ्या वादळी पावसाने भातशेती आडवी केली आहे.

शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ती कुजण्याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे बळीराजाला चिंतेने ग्रासले आहे.

राज्यात खरीप आणि रब्बी मिळून एकूण ३१,५१९ हेक्टर क्षेत्रफळात भातशेतीचे उत्पन्न घेतले जाते. त्यापैकी खरीप कालावधीत २२,५६९ हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली आहे.

नार्वे, ताळगाव, मये, चोडण, कोलवाळ, हळदोणा, सत्तरी, काणकोण, सांगे भागातील भातशेतीला पावसामुळे धोका निर्माण झाला आहे.

Goa Farming News
Mapusa Crime News: खोर्लीतील ओढ्यात आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली

जून महिन्याचा पहिला पंधरावडा पावसाविना गेला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. जुलै महिन्यात पावसाने झोडपले. परंतु ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस मंदावल्याने शेती पाण्याविना सुकते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती.

परंतु आता ऐन पिकाच्या बहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकाची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भात ‘पोचट’ होण्याची शक्यता

यंदा मान्सूनला विलंब झाल्याने पेरणी उशिरा झाली. आता कोठे भातशेती ऐन बहरात येत आहे. भात पोटरीला आले आहे.

अशा अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने झोडपल्याने भात पोचट (पोल) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाच्‍या लहरीपणाचा फटका

जून महिन्यात बरेच दिवस पाऊस गायब झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली. साहजिकच शेतकऱ्यांनी भातशेतीच्‍या लागवडीला सुरूवात केली. परंतु काही ठिकाणी भात रोपे तयार नसल्यामुळे भाताची लावणी करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला.

दरम्यान, कमी-अधिक पडणारा पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला. परंतु आता शेती तयार झाली असताना पावसाने जोर धरल्‍याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com