गोव्यात पर्यटन खात्यातर्फे बांधण्यात आलेल्या हेलिपॅड चे उदघाटन

गोवा हा भारताची शान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही गोव्याकडे खास लक्ष आहे.
Inauguration of helipad constructed by Tourism Department in Goa
Inauguration of helipad constructed by Tourism Department in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकार (Central Government) गोव्यातील (Goa) बेरोजगारी (Unemployment) कमी करण्यासाठी पर्यटन (Tourism) क्षेत्राच्या माध्यमात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहे. त्यासाठी गोव्याला शक्य ती सर्व मदत केली जाईल. येत्या महिन्यात आपण गोव्यात येणार असून त्यावेळी पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या विविध संधी बाबत विविध घटकांची चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांना हव्या असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठीही योग्य ते उपाय योजले जाणार आहेत .अशी घोषणा केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी आज केली . केंद्र व गोवा सरकारच्या (Goa Government) पर्यटन खात्याच्या जुने गोवे (Old Goa) येथे बांधण्यात आलेल्या सुमारे

पाच कोटी खर्चाच्या हेलिपॅडचे (Helipad) उद्घाटन केल्यानंतर रेड्डी बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे, कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, जुने गोव्याच्या सरपंच जेनीता मडकईकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना रेड्डी यांनी सांगितले की गोवा हा भारताची शान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही गोव्याकडे खास लक्ष आहे.

Inauguration of helipad constructed by Tourism Department in Goa
Goa Is One: गोवा सरकारला कसली घाई झालीय?

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रात विकास करत असून गोव्यामध्ये पर्यटन विकासासाठी शक्य ती सर्व मदत केंद्र सरकार करणार आहे. आपण इस्रायल दौऱ्यावर असताना गोव्याबाबत अनेकांकडून उल्लेख आपण ऐकला . त्यावरून गोवा जगामध्ये पर्यटनासाठी किती प्रसिद्ध आहे याची जाणीव झाल्याचे सांगून गोव्यात विकास कामे करतानाच येथील चर्चा परिसरांचाही विकास करण्यात येणार असल्याचे रेड्डी म्हणाले.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे गोव्यातील पर्यटन उद्योग थांबला होता मात्र आता हळूहळू तो सुरू होत असून त्यासाठी गोवा सरकारला केंद्राकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल. व हवा तो निधी उपलब्ध केला जाईल असेही रेड्डी यांनी सांगितले .

गोवा सरकारचा स्वतःचा असा हा सुमारे पाच कोटी रुपये खर्चाचा हेलिपॅड निर्माण झाल्यामुळे त्याचा लाभ गोव्यातील पर्यटन वाढीसाठी होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. खाजगी आणि सरकारी या क्षेत्रासाठी या हेलिपॅड चा वापर होणार असून पर्यटन विकासासाठी सरकार जी पावले उचलत आहे त्याचाच हा एक भाग असल्याचे सांगून गोव्याच्या मुक्तीची 60 वर्षे आणि भारताच्या स्वातंत्र्याची आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने हा हेलिपॅड लोकार्पण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Inauguration of helipad constructed by Tourism Department in Goa
Goa: पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना

खाजगी एजन्सी नियुक्त करून हेलिपॅड चालवायला देणार

जुने गोवे येथे पाच कोटी खर्च करून बांधण्यात आलेला हेलिपॅड खासगी एजन्सीला चालवायला देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये निविदा यादी केली जाणार आहे .सदर एजन्सी स्वतःचे हेलिकॉप्टर आणून पर्यटकांसाठी ते उपलब्ध करणार असल्याची माहिती पर्यटन खात्याचे माहिती अधिकारी दीपक नार्वेकर यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com