Lok Sabha Election: दक्षिणेत गोमंतकीय महिलाच उमेदवार

Lok Sabha Election: भाजपचे ठरले : प्रदेश पातळीवरील मतांचा विचार, दोन दिवसांत निश्चिती
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election:

‘दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून जिंकून येण्याची क्षमता असलेल्या गोमंतकीय महिला उमेदवाराचा शोध पूर्ण झाला आहे. येत्या दोन दिवसांत त्या नावासह अन्य काही नावांवर चर्चा केली जाईल’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. ते नाव साऱ्यांसाठी आश्चर्य असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

ते म्हणाले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दक्षिण गोव्यातून महिला उमेदवाराचे नाव सुचवा, अशी सूचना केली आहे. त्यानुसार गाभा समितीला कल्पना देत उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार संघटनात्मक पातळीवरून काही नावे सुचवण्यात आली तर काही जणांनी स्वतंत्रपणे आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. जिंकून येण्याची क्षमता हा निकष असल्याने त्या नावांवर त्या दृष्‍टिकोनातून विचार करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पान ९ वर

Lok Sabha Election
Lok Sabha Election: ...आणि उमेदवारीसाठी तानावडेंच्या मोबाईलवर अनेक इच्छुक महिलांचे कॉल

‘नारी शक्ती वंदना’साठी आशिष सूद गोव्‍यात

भाजपचे निवडणूक निरीक्षक आशिष सूद हे गोव्यात याच तयारीसाठी आले का असे विचारल्यावर तानावडे यांनी सांगितले, की नारी शक्ती वंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने ते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दृकश्राव्य माध्यमातून महिलांशी संवाद साधणार आहेत. चाळीसही मतदारसंघांत महिलांसाठी दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंदाज काय दर्शवितात?

  1. काँग्रेसकडे रवी नाईक, दिगंबर कामत, इजिदोर फर्नांडिस, सुभाष शिरोडकर हे नेते नसल्याने काँग्रेसला किती मतदान होईल याचा अंदाज घेतला जात आहे.

  2. फ्रान्‍सिस सार्दिन यांना उमेदवारी दिली, तर ख्रिस्ती मते त्यांना पडतील. चोडणकर यांना उमेदवारी दिली, तर ख्रिस्ती मते त्यांच्या पारड्यात फारशी पडणार नाहीत; पण हिंदू मतांच्या एकगठ्ठेपणाला ते खिंडार पाडू शकतील.

  3. चोडणकर यांना उमेदवारी दिली, तर आम आदमी पक्ष त्यांना कितपत सहकार्य करेल याचीही अंतर्गत चाचपणी सत्ताधारी भाजपने सुरू केली आहे.

Lok Sabha Election
Goa Student: परिवर्तन घडविण्याची क्षमता तरुणाईत

हिंदू मतांवर भाजपची नजर

दक्षिण गोव्यातील हिंदू मतांवर सत्ताधारी भाजपची नजर आहे. या मतांचे ध्रुवीकरण करता आले, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ मग उमेदवार कोणीही असला तरी जिंकणे कठीण होणार नाही, अशी ही रणनीती तयार करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com