Lok Sabha Election: ...आणि उमेदवारीसाठी तानावडेंच्या मोबाईलवर अनेक इच्छुक महिलांचे कॉल

Lok Sabha Election: सत्ताधारी भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवाराची निवड करण्याचे ठरवल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा मोबाईल आज दिवसभर खणखणत होता.
Sadanand  Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election:

सत्ताधारी भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवाराची निवड करण्याचे ठरवल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा मोबाईल आज दिवसभर खणखणत होता. अनेक महिलांनी त्यांना दूरध्वनी करून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यास सुरवात केली आहे.

त्यांना ‘भाजपचे सदस्यत्व स्वीकारा, स्वतःची माहिती लिखित स्वरूपात सादर करा’ यापलीकडे कोणतेही आश्वासन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे देऊ शकले नाहीत. भाजपसमोर काल महिला उमेदवार कोण असावी, हा प्रश्न होता,

तर आज अनेकजणींनी उमेदवार होण्याची तयारी दाखवली हे चित्र होते. उमेदवारीसाठी तानावडेंना संपर्क साधलेल्या काहीजणी भाजपच्या सदस्य देखील नाहीत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा मोबाईल आज दिवसभर अशा कॉल्समुळे वाजत होता.

Sadanand  Tanavade
Goa Congress: काँग्रेसचे मुख्य सचिवांना पत्र

केवळ राजकारणातीलच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची गुढी उभी केलेल्या अनेक जणींनी भाजपची उमेदवारी स्वीकारण्याची तयारी दर्शवलेली आहे.

त्यातही काही ख्रिस्ती महिलांचाही समावेश आहे. त्या महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांना ख्रिस्ती धर्मगुरूंचाही पाठिंबा आहे. अशा महिलांनी आधी रीतसर भाजपमध्ये प्रवेश करावा, असे सध्या त्यांना सांगण्यात येत होते.

Sadanand  Tanavade
Goa Student: परिवर्तन घडविण्याची क्षमता तरुणाईत

दक्षिण गोव्यातून भाजपच्या उमेदवारीवर लढण्यासाठी अनेक महिलांनी तयारी दर्शवलेली आहे. आश्चर्य म्हणजे राजकारणात नसलेल्या अनेक जणी यासाठी पुढे आलेल्या आहेत. त्यांना सध्या भाजपचे सदस्यत्व स्वीकारा आणि आपली माहिती सादर करा एवढाच सल्ला देत आहे.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com