पणजीत ‘सांज सुरांची’ला रसिकांची भरभरून दाद

शिगमोत्सव समितीतर्फे रसिकांना पर्वणी
Music
Music Source Google
Published on
Updated on

पणजी: पणजी शिगमोत्सव समितीतर्फे आझाद मैदानावर झालेल्या ‘सांज सुरांची’ या निषाद क्रिएशननिर्मित कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद लाभली. राजेश खंवटे यांनी हा कार्यक्रम पुरस्कृत केला होता.

‘झी’ युवावरील संगीत सम्राटचे मुंबई येथील मानकरी गायक अभिषेक नलावडे व साक्षी मराठे तसेच गुरू ठाकूर यांच्या कार्यक्रमात गाणारी प्रसिद्ध युवा गायिका साधना काकतकर यांनी मराठी भावगीते, चित्रपट गीते, गझल, युगुलगीते, लावणी अशा विविधरंगी गीतांची रसिकांना मेजवानी दिली. गणनायका... या रचनेने सुरूवातीला अभिषेक यांनी वातावरण भारून टाकले. मन उधाण वाऱ्याचे, जेव्हा तुझ्या बटांना, चिंब भिजलेले, पाहिले न मी तुला अशा रचना त्यांनी प्रभावीपणे गाऊन उत्‍स्‍फूर्त दाद घेतली.

Music
गोव्यात प्रमोद सावंतांसह कोणत्या मंत्र्यांचा शपथविधी?

साधना यांनी जय शारदे.., या सुखानो या, शारद सुंदर, फुलले रे क्षण, पाण्यातले पाहत, नभ उतरुं आलं..अशा रचना रसिल्या शैलीत गाऊन रंग भरला. साक्षी हिने हृदयी प्रीत.., घनरानी, अधीर मन झाले, रुपेरी वाळूत व जाळी मंदी ही लावणी समरसून गाऊन रसिकांना रिझविले. तसेच संधी काली.., मला वेड लागले, गोमू संगतीनं, जीव रंगला या युगुल गीतांनी कार्यक्रमात आगळे रंग भरले. साधना व साक्षी यांनी गायिलेल्या गोऱ्या गोऱ्या गालावरी या गीताला तर रसिकांनी उचलून धरले.

Music
हणजूणमध्‍ये महिला पत्रकारास धमकी; तिघांविरोधात तक्रार

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाचा समारोप जयोस्तुते, म्यानातून उसळे तलवारीची पात.. या स्फूर्तिदायी रचनांनी झाली. नेहा उपाध्ये हिचे सुरेख निवेदन व नितीन कोरगावकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड)व शिवानंद दाभोलकर (संवादिनी) यांची बहारदार साथ लाभल्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. पणजी शिगमोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन कलाकारांचा सन्मान केला. केशव नाडकर्णी यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com