गोव्यात प्रमोद सावंतांसह कोणत्या मंत्र्यांचा शपथविधी?

भाजपकडून नावं गुलदस्त्यात, गोव्यात कॅबिनेट मंत्रिपदाचा सस्पेन्स कायम
Goa Assembly Swearing Ceremony Updates
Goa Assembly Swearing Ceremony UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. तसंच कॅबिनेटमधील अन्य मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. असं असलं तरीही या मंत्रिमंडळात नेमकं कुणाला स्थान मिळणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Goa Assembly Swearing Ceremony Updates
गोवा सभापती निवड: आलेक्स सिक्वेरांविरुद्ध रमेश तवडकरांचे पारडे जड

रविवारी संध्याकाळपर्यंत महत्त्वाच्या मंत्रिपदाचे दावेदार असलेल्या आमदारांनाही शपथविधीबाबत माहिती देण्यात आली नव्हती. शपथविधीपूर्वीच मंत्रिपदाची माळ ज्यांच्या गळ्यात पडणार आहे, त्या आमदारांना काहीवेळ आधी याची माहिती दिली जाणार आहे. हाच फॉर्म्युला भाजपने (BJP) उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही अमलात आणला आहे.

ज्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, अशांना निमशासकीय महामंडळांचं अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सर्व आमदारांना त्यांची कोरोना RT - PCR चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर प्रत्येक आमदाराला 5 निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या आहेत.

Goa Assembly Swearing Ceremony Updates
गोव्यात भाजपविरोधात विरोधकांची मोट

मुख्यमंत्र्यांनी (CM) त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्या संभाव्य मंत्र्यांनाही आपला शपथविधी होणार आहे का याबाबत संभ्रम असल्याचं चित्र आहे. गोव्यात भाजप निरीक्षक सी टी रवी आणि देवेंद्र फडणवीस ही या नावांबाबत सर्व ती काळजी घेत असल्याचं चित्र आहे. गोव्यात कॅबिनेट मंत्रिपदासाठी सुभाष शिरोडकर, मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, विश्वजीत राणे, बाबुश मोन्सेरात, रोहन खंवटे, नीलेश काब्राल, निळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे, सुभाष फळदेसाई, मगोपचे (MGP) सुदिन ढवळीकर आणि अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची नावं चर्चेत आहेत. मात्र याबाबत अजून मोठा सस्पेन्स बाळगण्यात आला आहे. सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई तसंच, अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास ते सरकारमधील नवे चेहरे असतील. गोव्यात जास्तीत जास्त 11 कॅबिनेट मंत्रिपदाच्या जागा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkani Essay Book Launch
Damone Family Fire Case Belagavi
Santinez Footpath Damage Panaji
Rape Case Promise of Marriage Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com