Goa Taxi: मुरगाव जेटी प्रकरण; दोन्ही टॅक्सी मालकांचे परवाने निलंबीत

शुक्रवारी दोन टॅक्सीचालकांना झाली होती अटक, जामिनावर सुटका
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak

मुरगाव हार्बर पर्यटक क्रुझ जेटीवर अमेरिकन पर्यटकांना दादागिरी प्रकरणात सहभागी असलेल्या दोन्ही टॅक्सी मालकांचे परवाने निलंबीत करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात त्यांना पुन्हा परवाने न देण्याचे निर्देश वाहतूक संचालकांना दिले आहेत अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

Mauvin Godinho
Sanguem IIT: केंद्राचा राज्य सरकारला दणका; सांगेतील आयआयटीचे स्थलांतर होणार?

मुरगाव हार्बर पर्यटक क्रुझ जेटीवर १४ डिसेंबर रोजी सायंकाळी अमेरिकन पर्यटक जहाज 'ओशन ओडीसी ' दाखल झाले होते. हे जहाज मुंबईतून आले होते. यावेळी जहाजातले 40 पेक्षा जास्त अमेरिकन जेष्ठ नागरिकांनी गोवा दर्शनासाठी खासगी बस बूक केली होती. परंतु खासगी बसचालकांकडे जेटीवर जाण्याचा परवाना नसल्याने पर्यटक जहाजापासून चालत बसकडे जात होते. यावेळी टॅक्सी व्यवसायिकांनी टॅक्सी मधून येण्याची सक्ती करत त्यांची अडवणूक केली. यावरून पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांनी बस चालकाला मारहाण केली.

Mauvin Godinho
Goa : आप, टीएमसी विरोधात 'या' कारणामुळे 13 गुन्हे दाखल

दरम्यान, अमेरिकन पर्यटकांची अडवणूक करणे आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाला मारहाण करणे या आरोपाखाली शुक्रवारी मुरगाव पोलिसांनी दोन टॅक्सीचालकांना अटक केली आहे. तसेच ९ जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी पोलिस वास्को उपअधीक्षक शेख सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगाव पोलिसांनी दोन टॅक्सीचालकांना अटक केली व नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

यापक्ररणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी माफी मागितली. ते म्हणाले, टॅक्सीवाल्यांवर जे आरोप करण्यात आले आहेत, त्याविषयीचे जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. परंतु त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहे. टूर ऑपरेटर आणि टॅक्सी चालकांमध्ये गैरसमज झाल्याने वरील प्रकार घडला आहे. दोन्ही संघटनांना जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण क्षमापत्र देण्यास सूचित करणार आहोत. टॅक्सी चालक संघटना व टूर ऑपरेटर्स यांच्यात यापूर्वी असा प्रकार घडला नाही. या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असे म्हणत आमोणकर यांनी माफी मागितली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com