Goa : आप, टीएमसी विरोधात 'या' कारणामुळे 13 गुन्हे दाखल

निवडणुक काळातील प्रकारमुळे कारवाई
AAP TMC Goa
AAP TMC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी होर्डिंग्‍सबाजी केली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर सर्व होर्डिंग्‍सवर कारवाई केली होती. दरम्यान, सरकारी व सार्वजनिक जागेचे विकृतीकरण केल्याप्रकरणी आप व टीएमसी पक्षाविरुध्द राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत 13 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

AAP TMC Goa
Goa Police : पेडणे पोलिसांची धडक कारवाई; सापळा रचत ड्रग्स विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी आप व टीएमसीने सरकारी व सार्वजनिक जागी आपल्या पक्षाचे चिन्हे पोस्ट केली होती. त्यामुळे सरकारी व सार्वजनिक जागेचे विकृतीकरण केल्याच्या आरोपाखाली आप टीएमसी विरुध्द पोलीस ठाण्यांत 13 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पणजी, म्हापसा, कोलवाळ, पेडणे पोलीस ठाण्यांत आपवर 12 तर टीएमसीवर एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AAP TMC Goa
Goa Liberation Day: गोवा सरकारला दोडामार्ग येथील स्वातंत्र्य सैनिकांचे विस्मरण

विधानसभा निवडणुकीच्यावेळी राज्‍यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर निवडणूक आयोगाने सर्वप्रथम होर्डिंग्‍स लक्ष्‍य केले होते. रविवारपासून आयोगाने ही मोहीम व्‍यापक करताना तृणमूल काँग्रेस, आप, काँग्रेस पक्षाच्‍या होर्डिंग्‍सना अचूक हेरले व ते टराटरा फाडले होते. तर काही ठिकाणी त्‍या पक्षाच्‍या श्रेष्ठींच्‍या फोटोंना काळा व निळा रंग फासून ते लपविण्‍याचा प्रकार खुलेआम सुरू झाला होता. मात्र, या मोहिमेत भाजपच्‍या होर्डिंग्‍सना झुकते माप देण्यात आले होते, त्‍याबद्दल लोकांकडून आश्‍चर्य व्‍यक्त केले जात होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com