Margao Municipality: मडगाव शहरामध्येही घरांच्या ‘जीआयएस’ सर्वेक्षणाचे संकेत, मुख्याधिकारी तटस्थ

मुख्याधिकारी तटस्थ : पालिका प्रशासन संचालनालयाकडून सूचना नाही
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या घरांचे नव्याने ‘जीआयएस’ पद्धतीने सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असतानाच राज्यातील सर्वांत मोठी व्यावसायिक आस्थापने असलेले शहर, अशी ज्याची ओळख आहे, त्या मडगाव शहरातही लवकरच असे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Margao Municipality
Goa Farm: घटत्या लागवड क्षेत्राचा सरकारी धोरणावर परिणाम..भात, डाळी उत्पादनात चढउतार

एका खासगी संस्थेकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत पहिल्या पाच प्रभागांतील काम पूर्ण झाल्याची माहिती म्हापसा पालिकेतून मिळाली असून प्रभाग सहामध्ये आता सर्वेक्षण केले जात आहे.

मडगावचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांना विचारले असता, पालिका प्रशासन संचालकांच्या कार्यालयातून अजून तरी आम्हाला तशा सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांना विचारले असता, त्यांनीही अजून या अशा सर्वेक्षणाबद्दल निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती दिली.

...हा तर पालिकेचा नाकर्तेपणा

जर असे सर्वेक्षण होत असेल तर त्याला मडगाव पालिकेचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला. शहरात अशी कितीतरी घरे आहेत, जी करांच्या कक्षेत कधीच आणली गेली नाहीत. त्यामुळेच सरकार हे काम आता खासगी कंपनीकडून करत असावे.

Margao Municipality
37th National Games News Update: गावडेंच्या कार्यपद्धतीवर केंद्रीय क्रीडामंत्री असमाधानी, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

मात्र, असे सर्वेक्षण करून झाल्यावर त्या घरमालकाकडून पालिका महसूल गोळा करणार, की हा अहवाल तसाच शीतपेटीत ठेवणार हा खरा प्रश्न आहे, असेही कुतिन्हो म्हणाले.

काही वर्षांपूर्वी मडगाव पालिकेने स्वतः पुढाकार घेऊन मडगाव बाजार (प्रभाग १४) परिसराचे असे जीआय पद्धतीने सर्वेक्षण केले होते, त्यावेळी पालिकेला ३ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, लाखो रुपये खर्च करून केलेल्या या सर्वेक्षणाचा नंतर कधीच वापर केला नाही.

- सावियो कुतिन्हो, निमंत्रक, शॅडो कौन्सिल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com