Goa Farm: घटत्या लागवड क्षेत्राचा सरकारी धोरणावर परिणाम..भात, डाळी उत्पादनात चढउतार

तीन वर्षांतील माहिती : घटत्या लागवड क्षेत्राचा सरकारी धोरणावर परिणाम शेतकऱ्यांचा अळंबी उत्पादनाकडे कल
Goa Farm
Goa FarmDainik Gomantak
Published on
Updated on

विलास ओहाळ

राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने शेती क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्याचे ठरवले असले तरी लागवडीचे घटते क्षेत्र पाहता ते स्वप्न सत्यात येणे अशक्यप्राय वाटते. राज्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेती केली जात असली तरी मागील 2020-21, 2021-22 व 2022-23 या तीन वर्षांच्या पीक लागवड क्षेत्राचा विचार केला तर भात क्षेत्र आणि डाळी उत्पादन क्षेत्रात चढउतार दिसून येत आहे.

Goa Farm
Goa Medical College: सुपर स्पेशालिटी विभागाला आरोग्यमंत्री राणेंची भेट; भेटीदरम्यान घेतला 'या' गोष्टींचा आढावा

कृषी संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून, भुईमूग लागवड क्षेत्र २०२०-२१मध्ये ७४ हेक्टर आणि उत्पादन १६५ मे.टन होते. २०२१-२२मध्ये लागवड क्षेत्र ७९ हेक्टर व उत्पादन १६० मे.टन होते. हे लागवड क्षेत्र सरासरी ७० हेक्टरवर राहिले. २०२२-२३ मध्ये लागवड क्षेत्र ६७ हेक्टर व उत्पादन १०६ मे.टन झाले आहे .

काजू लागवड क्षेत्रावर नजर टाकली तर त्यातही किंचितसा चढउतार दिसून येतो. २०२०-२१ मध्ये लागवड क्षेत्र ५६,८२९ हेक्टर व उत्पादन २७,३६६ मे.टन होते.

Goa Farm
Goa Crime News: गोलतकर खूनप्रकरणी गौरीश गावस याला सशर्त जामीन

२०२१-२२ मध्ये लागवड क्षेत्र ५६,८९० हेक्टर व उत्पादन २६,०३२ मे.टन होते आणि २०२२-२३ मध्ये लागवड क्षेत्र ५६,९३४ हेक्टर व उत्पादन २५,८०० मे.टन झाले आहे.

शेतकऱ्यांचा अळंबी उत्पादनाकडे कल

अळंब्यांना हॉटेल व नागरिकांकडून मागणी असल्याने अळंबी उत्पादनाला चालना मिळाली आहे. त्यामुळे अनेक जुने शेतकरी किंवा नवीन शेतकरी अळंबी उत्पादन करू लागले आहेत. २०२२-२३ मध्ये ६,२०४ मे.टन अळंब्यांचे राज्यात उत्पादन झाल्याचे दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com