गोवावासियांना स्वातंत्र्यसैनिकांचे दस्ताऐवज पाहण्याची संधी; पुराभिलेख सप्ताह प्रदर्शनाचे आयोजन

पुराभिलेख खात्यातर्फे दरवर्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते
Goa archaeology department
Goa archaeology departmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Revolution Day : पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या मुक्तीसाठी केलेल्या लढ्याबद्दल स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ पुराभिलेख खाते दरवर्षी 18 जूनपासून 'पुराभिलेख सप्ताह प्रदर्शन' आयोजित करते. यावर्षी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनसन्ग हिरोजवर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरालेख सप्ताह प्रदर्शन दोन ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. एक लोहिया मैदान, मडगाव येथे व दुसरे संस्कृती भवन पाटो पणजी येथे 18 जून ते 23 जून पर्यंत खुले राहणार आहे. मडगाव येथील प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून प्रदर्शन एका दिवसाचे असणार आहे.

Goa archaeology department
मातृभाषेच्‍या रक्षणासाठी प्रसंगी आंदोलनाला सज्ज व्‍हा : प्रा. सुभाष वेलिंगकर

गोवा मुक्ती चळवळीशी संबंधित पुराभिलेखागारामध्ये उपलब्ध विविध ऐतिहासिक नोंदी प्रदर्शित केल्या जात आहेत. यावर्षी देशाच्या विविध भागांतील स्वातंत्र्यसैनिकांवरील खटले, त्यांच्या विरोधात पोर्तुगिजांनी वापरलेले पुरावे, नोंदी यांची कागदपत्रे स्वातंत्र्यसैनिकांनी हाताने बनवलेले बॅनर आणि संक्षिप्त माहितीसह काही छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येत आहेत.

या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल गोमंतकीयांमध्ये राष्ट्रीय भावना आणि जागृती निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

Goa archaeology department
Goa Real Estate Market: सेकंड होम खरेदीसाठी ग्राहकांचे गोव्याला प्राधान्य; रिसर्चमधून समोर आली बाब

स्वातंत्र्यसैनिकाला पोर्तुगीजविरोधी प्रचारासाठी शिक्षा झाली तेव्हा त्यांच्याकडे राष्ट्रीय पत्रे, पुस्तके यासारखे काही दस्ताऐवज सापडले. त्यांच्याकडून पॅम्प्लेट्स, बॅनर जप्त करण्यात आले. हे सर्व दस्ताऐवज गोवा मुक्तीतील स्वातंत्रसैनिकांना शिक्षा करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरले गेले. या प्रदर्शनादरम्यान यातील काही कागदपत्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

मोडी मराठीचे जाणकार रत्नाकर देसाई यांनी संपादित केलेल्या ‘पोर्तुगीज हुकूमनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. या पुस्तकात पोर्तुगीज सरकारच्या विशेषत: फोंडा महालाशी संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजाविषयी उल्लेख आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com