मातृभाषेच्‍या रक्षणासाठी प्रसंगी आंदोलनाला सज्ज व्‍हा : प्रा. सुभाष वेलिंगकर

गोव्यातील भारतीय भाषाप्रेमी आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांना आवाहन
Goa News | Subhash Velingkar
Goa News | Subhash VelingkarDainik Gomantak

गोव्यातील भारतीय भाषाप्रेमी आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी मातृभाषा रक्षणासाठीच्‍या संभाव्य आंदोलनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन मंचचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

नवीन शैक्षणिक धोरण कार्यवाहीच्या धामधूमीत पायाभूत स्तरावर( पहिल्या पाच वर्षांचा टप्पा) मातृभाषा माध्यमाच्या अनिवार्यतेसंदर्भात सरकारने घेतलेल्या संशयास्पद व दिशाभूल करणाऱ्या निर्णयाच्‍या पार्श्वभूमीवर हा इशारा त्‍यांनी दिला.

Goa News | Subhash Velingkar
Goa Congress : भाजप सरकार कोकणी लेखकांची फसवणूक करतंय : अमरनाथ पणजीकर

आतापर्यंत सरकारतर्फे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्‍ये दिशाभूल करणारे ‘प्रादेशिक भाषा हेच शिक्षणाचे माध्यम, मात्र इंग्रजीतून शिकण्याचीही संधी’ असे म्‍हटले आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तरावर (पहिली पाच वर्षे) मातृभाषाच माध्यम असावे हा सर्वसामान्‍य नियम असताना ही इंग्रजीत शिकण्याची संधी कोण, कोणाला, कशासाठी देणार आहे? हे सरकारने ताबडतोब स्पष्ट करावे, असे वेलिंगकर यांनी म्‍हटले आहे.

सरकार पायाभूत स्तरावर इंग्रजी माध्यमाला मान्यता आणि पर्यायाने सरकारी अनुदान देणार असेल तर ते नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधातच नव्हे तर जागतिक शैक्षणिक सिद्धांताची पायमल्ली ठरणार आहे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी पुढे म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com