Goa Election 2022: काँग्रेसकडून रणनीतीला वेग

मागील चूक टाळणार: सत्तेसाठी भाजपविरोधी पक्षांना दारे खुली
Goa Election 2022 News
Goa Election 2022 News Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मतमोजणीपूर्वीच भाजपविरोधी पक्ष तसेच अपक्षांना सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर युती करण्यासाठी काँग्रेसने दारे खुली केली आहेत. विधानसभा निवडणुकीत गोमंतकियांनी काँग्रेसला कौल दिला असल्याचा ठाम विश्‍वास असल्याने सत्ता स्थापनेवेळी मागील चूक पुन्हा होऊ नये म्हणून तीन दिवस आधीच काँग्रेसचे गोवा ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम व प्रभारी दिनशे गुंडू राव हे दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीतील पक्षनेते राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस हालचालींना व व्यूहरचनेला वेग आला आहे. मतमोजणी होऊन सरकार स्थापन होईपर्यंत हे दोन्ही नेते गोव्यात ठाण मांडून राहणार आहेत. (Goa Election 2022 News Updates)

2017 मध्ये भाजपने काँग्रेसचे बहुमत असूनही सत्ता स्थापनेचा दावा केला व त्यानंतर पाच वर्षे काँग्रेसला सत्ता मिळवण्याची संधी मिळाली नाही. उलट त्यांच्या आमदारांची एका पाठापोठ गळतीच झाली. 17 आमदारावरून त्यांच्याकडे दोनच आमदार अखेरीस राहिले. यावेळी भाजप सत्तेपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे आमदार पुन्हा फोडण्याचे डावपेच आखण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून अगोदरच पी. चिदंबरम व दिनेश गुंडू राव यांना पक्षनेते राहुल गांधी यांनी गोव्यात पाठवले आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही व सर्वाधिक आमदाराच्या जागा मिळाल्या तर अपक्ष व इतर पक्षांशी युती करण्याची तयारी ठेवलेली आहे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. भाजपविरोधात लढलेल्या राजकीय पक्षांना सरकारमध्ये स्थान देण्याचे त्यांनी आश्‍वासनही दिले आहे.

Goa Election 2022 News
गोव्यात सरकार स्थापनेच्या पूर्वतयारीला जोर

राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर काँग्रेस गोवा ज्येष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम हे गोव्यातून गेले ते आता मतमोजणीला तीन दिवस बाकी असताना गोव्यात दाखल झाले आहेत. या पुढील तीन दिवसांत काँग्रेसच्या उमेदवारांची तसेच पक्षनेत्यांशी सत्ता स्थापनेसंदर्भातच्या मोर्चेबांधणीबाबत बैठका होण्याची शक्यता आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत वगळता बहुतेक उमेदवार नवोदित असून प्रथमच निवडणूक लढवत आहेत. 2017 साली विधीमंडळ नेता ठरवण्यावरून जो गोंधळ झाला होता तो पुन्हा यावेळी होणार नाही याबाबत पक्षनेते राहुल गांधी तसेच पी. चिदंबरम यांनी दक्षता घेतली आहे. त्यावेळी विधीमंडळ नेत्यांसाठी शर्यतीत असलेले कामत वगळता इतर सर्व नेते पक्ष सोडून गेले आहेत त्यामुळे ती परिस्थिती पुन्हा ओढवण्याची शक्यता कमी आहे.

Goa Election 2022 News
मांडवी नदीत सापडला कामगाराचा मृतदेह

विधीमंडळ नेते कामत की लोबो?

ही निवडणूक काँग्रेसला पोषक असल्याचा ठाम विश्‍वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. बहुमत मिळण्याइतपत उमेदवार निवडून येतील व पुन्हा एकदा मतदारांनी काँग्रेसला संधी दिली असल्याचे वातावरण सगळीकडे आहे असा दावा काँग्रेस नेते व कार्यकर्ते करत आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले मायकल लोबो व दिगंबर कामत यांच्यापैकी एकजण विधीमंडळ नेता असेल ते उघडपणे आहे. बार्देशमध्ये काँग्रेसला किती जागा मिळतात यावर लोबो यांचे वजन वाढणार आहे. ते सुद्धा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत हे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com