BJP VS Congress
BJP VS CongressDainik Gomantak

गोव्यात सरकार स्थापनेच्या पूर्वतयारीला जोर

बैठकांचे सत्र: काँग्रेस सक्रिय, मुख्यमंत्री दिल्लीत, तानावडे मुंबईला
Published on

पणजी: यंदा प्रथमच एकाचवेळी चाळीसही मतदारसंघाची मतमोजणी 10 मार्चला होत आहे. सकाळच्या सत्रातच विधानसभेच्या सत्तेचा कल स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वीच, राज्यातील दोन मोठे राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजपने सत्ता स्थापनेच्या पूर्वतयारीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटांमध्ये मोर्चेबांधणी आणि बैठकींच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

2017 ची पुनरावृत्ती होऊ नये, याची भीती नसावी म्हणून पी. चिदंबरम आणि दिनेश गुंडू राव गोव्यात दाखल झाले असून ते सोमवारी सर्व उमेदवारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला आघाडीतील मित्र पक्ष गोवा फॉरवर्डही सहभागी होणार आहे.

याशिवाय पुढच्या दोन दिवसांमध्ये ते अपक्ष आणि अन्य पक्षांच्या छोट्या पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रामुख्याने मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि कार्याध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर हे नेते गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्या सोबत स्वतंत्र चर्चा करणार आहेत.

भाजपची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

पाचही राज्यांच्या निवडणुका आणि यापुढची रणनीती यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी भाग घेतला. यावेळी गोव्याच्या निवडणुकीवरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

 BJP VS Congress
कदंबवरील झाडे तोडल्याबद्दल चिंबल स्थानिकांत चिंता

सदानंद शेट तानावडे - देवेंद्र फडणवीस भेट

सदानंद शेट तानावडे आज मुंबईला रवाना झाले. ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत. यापूर्वीच फडणवीस यांनी मगोपचे सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. अपक्ष उमेदवारांशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी वादळापूर्वीची शांतता दिसत असली, तरी पडद्यामागचे सूत्रधार सक्रिय झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज मुंबईत बैठक होत असून यासाठी पक्षांच्या निवडक नेत्यांसह मी मुंबईला जात आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भात सविस्तर चर्चा होईल. त्यानंतर देवेंद्रजी 9 मार्च रोजी गोव्यात येतील. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येईल याची आम्हाला खात्री आहे.

- सदानंद शेट तानावडे

 BJP VS Congress
कुंकळ्ळीतील बेपत्ता युवती सापडली फोंड्यात

काँग्रेस आघाडी करण्यास तयार आहे. तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षाचेही स्वागत आहे. मात्र, निर्णय त्यांच्या नेत्यांनी घ्यायचा आहे. मगोचेही आम्ही स्वागत करतो. उद्या ७ मार्चला काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भेटणार आहोत व व्यूहरचनेबाबत त्यांना कल्पना दिली जाणार आहे.

- दिनेश गुंडू राव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com