गोवा निवडणूक यंत्रणा गतिमान: 5 जानेवारीला अंतिम मतदार याद्या जाहीर

गोव्यात 2 हजार 300 एम-3 ही अत्याधुनिक ईव्हीएम मशीन खास बेळगावहून आणण्यात आल्या.
Goa Election Commission
Goa Election CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात (Goa) निवडणुकांचे (Election) बिगूल वाजू लागले असून राजकीय पक्षही जोरात तयारीला लागले आहेत. येत्या फेब्रुवारीच्या मध्यास राज्यात विधानसभा निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाच्या तयारीवरून स्पष्ट झाले आहे. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदार याद्यांच्या संदर्भात विशेष अभियान जाहीर केले असून 5 जानेवारीला अंतिम मतदार याद्या जाहीर होतील, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी  चर्चा करण्यासाठी सोमवारी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत  भाजपकडून पुंडलिक नाईक, राष्ट्रीय काँग्रेसचे आल्तिन गोम्स  , गोवा फॉरवर्ड सरचिटणीस दुर्गादास कामत, राष्ट्रवादी काँग्रेस अविनाश भोसले  आणि मगो पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयोगाकडून राजकीय पक्षांकडून सूचना आणि तक्रारी मागविल्या होत्या त्यानुसार काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डकडून मुरगाव येथील एकाच कार्यालयातील अधिकारी नेमल्याची तक्रार होती. तेथील अधिकारी बदलल्याची माहिती आयोगाने दिली. यावर सर्वच  राजकीय पक्षांनी आयोगाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे.

Goa Election Commission
Goa Election: सांताक्रुझ मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत शक्य

2 हजार 300 एम-३ ईव्हीएम

राज्यात 2 हजार 300 एम-3 ही अत्याधुनिक ईव्हीएम मशीन आल्या आहेत. त्या खास बेळगाव येथून आणण्यात आल्या. 26 ऑक्टोबर रोजी प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून ती राजकीय पक्षांसाठी आणि सामान्यांसाठी खुल्या असतील, अशी माहिती सावंत यांनी दिली आहे.

64उमेदवारांची नावे...

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी अद्यावयत अशी ‘एम-3’ ही मशीन वापरली जाणार आहे. जुन्या मशीनमध्ये 32 उमेदवारांच्या नावाची सोय होती आता नव्या मशीनमध्ये 64 उमेदवारांच्या नावांचा समावेश केला जाऊ शकतो. शिवाय मतमोजणी, दुरुस्ती याबाबतही ती तांत्रिकरित्या अधिक सक्षम असेल

Goa Election Commission
Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणार

‘बीएलओ’ चार दिवस बूथवर

मतदान याद्यांमध्ये नव्याने नाव दाखल करण्यासाठी किंवा नावे रद्द करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 20-21 नोव्हेंबर आणि 27-28 नोव्हेंबर अशा दिवसांमध्ये प्रत्येक बूथवर ‘बीएलओ’ व इतर  निवडणूक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कुणाल यांच्या बाबत काँग्रेसमध्ये मतभेद

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सहा वर्षे सीईओ पदावर असलेल्या कुणाल यांना हटविण्याची मागणी केली आहे तर पक्षाचे पदाधिकारी आल्तिन गोम्स यांनी कुणाल हे चांगले काम करत असल्याचा दावा केला. त्यामुळे काँग्रेसमध्येच कुणाल यांच्याबाबत मतभेद आहेत. गोम्स म्हणाले, की कुणाल यांच्याबाबत असलेले हे माझे मत आहे मात्र प्रदेशाध्यक्ष यांचे वेगळे मत असू शकते असे सांगत उत्तर देण्याचे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com