G-20 परिषदेमुळे गोव्याच्या संस्कृतीचे संपूर्ण जगाला दर्शन होईल; मुख्यमंत्र्यांचा आशावाद

गोव्यात होणार्‍या G-20 संमेलनांमुळे गोव्याच्या साहित्य, संस्कृती, कला आणि खाद्यपदार्थांचे दर्शन जगाला होण्यास मदत होणार आहे.
CM Dr. Pramod Sawant on G-20 Summit
CM Dr. Pramod Sawant on G-20 Summit Dainik gomantak
Published on
Updated on

CM Dr. Pramod Sawant on G-20 Summit : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतात होणार्‍या G-20 शिखर परिषदेमुळे देशाची समृद्ध सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करण्यात मदत होईल, तर गोव्यात होणार्‍या G-20 संमेलनांमुळे गोव्याच्या साहित्य, संस्कृती, कला आणि खाद्यपदार्थांचे दर्शन जगाला होण्यास मदत होणार आहे.

CM Dr. Pramod Sawant on G-20 Summit
Pravin Arlekar: युवकांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा

साखळी येथील शासकीय महाविद्यालयातील हिंदी विभाग आणि हिंदी संशोधन केंद्र कला, विज्ञान आणि वाणिज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'हिंदी साहित्यात व्यक्त केलेले जगाचे आर्थिक परिदृश्य' या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्र्यांनी ही विधाने केली.

स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये, केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात हिंदीची लोकप्रियता वाढली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "पुढील 25 वर्षांत हिंदीचा प्रभाव आणखी वाढणे आवश्यक आहे. जेव्हा आपण हिंदीला जागतिक मान्यता मिळवून देण्याबद्दल बोलतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय हिंदी चर्चासत्रे आयोजित केली जातात आणि त्यात जपान आणि ऑस्ट्रेलियातील मान्यवरांचा सहभाग असतो, या सगळ्या प्रयत्नातून भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे स्पष्ट होते."

प्राचीन काळापासून निर्माण झालेल्या बहुतेक साहित्यकृती संस्कृतच्या पुढे हिंदीत आहेत. गोव्यात तुलनेने हिंदीतील कमी साहित्यकृती निर्माण होतात, याकडे लक्ष वेधून त्यांनी येत्या 25 वर्षांत हिंदी साहित्यात गोव्याचे योगदान लक्षणीय असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Modi UAE Visit 2026
CM Pramod Sawant
Goa Panchayat Construction
BVSc and AH Degree Course Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com