Pravin Arlekar: युवकांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा

प्रवीण आर्लेकर- अनुसूचित जाती-जमाती लाभार्थी जनजागृती कार्यशाळेचे उद्‍घाटन
Pravin arlekar
Pravin arlekarDainik Gomantak
Published on
Updated on

सगळ्याच युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणे शक्य नाही. युवकांनी विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊन उद्योग-व्यवसाय करून आपले भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन आमदार तथा हस्त कारागिरी महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे येथे बोलताना केले.

कौशल्य विकास आणि उद्योग संचनालय, श्रम शक्ती भवन, पणजी व पेडणे आयटीआय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती-जमाती लाभार्थ्यांसाठी कौशल्य विकासाबाबत जनजागृती कार्यशाळेचे आर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्‍घाटन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

Pravin arlekar
Water Dispute: पेडणे तालुक्यात तीव्र पाणी समस्या

याप्रसंगी व्यासपीठावर खास निमंत्रित नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, शारदा उच्च माध्यमिक विद्यालय वझरीचे मुख्याध्यापक गजानन मराठे ,विनायक कांबळी, एस. एस. गावकर, पेडणे आयआयटी केंद्राचे प्राचार्य दत्तप्रसाद पाळणी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष माधव शणै देसाई, सहाय्यक संचालक विनायक कांबळी, एस. एस. गावकर, श्रीराज पार्सेकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. पेडणे आयटीआयतर्फे प्रशिक्षाणार्थी महिलांना प्रशस्तीस्ती पत्रे देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com