महत्वाची बातमी! मोबाईल उत्पादन क्षेत्रात तब्बल 'एवढ्या' मोठ्या संख्येने रोजगार झालेत उपलब्ध

चंद्रशेखर : कौशल्य केंद्रांना निधीसाठी केंद्र वचनबद्ध
Employment
EmploymentDainik Gomantak
Published on
Updated on

Employment देशाच्या अर्थव्यवस्थेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोबाईल, फोन उद्योग क्षेत्रात 9 लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण झाले असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रातील भाजपा सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना चंद्रशेखर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी धोरणांमुळे आर्थिक उलाढाल वाहत आहे. गोव्याने पारंपरिक आयटी उद्योगा व्यतिरिक्त उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे.

Employment
Panjim Market: पणजी मार्केटची गळती थांबणार कधी? दुरुस्तीला मंजुरी देऊनही अद्याप काम नाही

मंत्री चंद्रशेखर फातोर्डा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आमदार दिगंबर कामत, आमदार कृष्णा साळकर, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीबद्दल चर्चा केली.

याचबरोबर संपर्क से संमेलनात बोलताना मंत्री चंद्रशेखर म्हणाले, २०१४ पूर्वीच्या सरकारांनी २०१४ नंतर घराणेशाहीसाठी काम केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी अथक परिश्रम केले.

Employment
Agonda : ‘आगोंद’ला हरित, स्वच्छ पंचायत पुरस्कार; मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांच्या हस्ते सन्मान

आठ हजार कोटींचा निधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडियाच्या व्हिजनचा संदर्भ देत मंत्री म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य केंद्रे स्थापन करण्यासाठी ८ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे.

आम्ही कौशल्य केंद्रांना निधी देण्यासाठी आणि पुढील दशकासाठी तरुणांना तयार करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com