Panjim Market: पणजी मार्केटची गळती थांबणार कधी? दुरुस्तीला मंजुरी देऊनही अद्याप काम नाही

छतावरील पत्रा झाला खराब: महापालिकेने दुरुस्तीला मंजुरी देऊनही काम नाही
Panjim Market
Panjim MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Market पणजी महानगरपालिकेच्या मालकीच्या मार्केट इमारतीची गळती निघणार कधी? हा प्रश्‍न गेली काही पावसाळ्यांपासून कायम आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत छताच्या दुरुस्तीच्या खर्चाला मंजुरी मिळूनही कामाला अद्यापि सुरुवात झाली नाही.

सध्या मार्केटमधील विक्रेत्यांना गळतीपासून वाचण्यासाठी प्लास्टिकच्या तावदानांची मदत घ्यावी लागत आहे. काही ठिकाणी पत्राही गायब झाला आहेत.

महानगरपालिकेच्या मार्केट इमारतीमध्ये भाजी आणि फळविक्रेते सोपोवर आपली दुकाने थाटतात. काही सोपो इतर साहित्य विक्रीसाठीही वापरले जातात. गेल्या मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात या इमारतीचे छत गळत असते.

Panjim Market
सराफ दुकानातील सेल्समनने 'त्या' पैशातून केली गोवा, मुंबईची सैर; सोने चोरुन त्याजागी ठेवायचा बेंटेक्सचे दागिने!

या पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी गळणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी विक्रेते प्लास्टिकची तावदाने लावतात. यंदाही विक्रेत्यांना पुन्हा एकदा प्लास्टिकच्या तावदानांचा वापर करावा लागला आहे.

सोपो करात वाढ करूनही महानगरपालिका बाजार समिती विक्रेत्यांच्या समस्या सोडवत नसल्याच्या तक्रारी विक्रेते करीत आहेत.

सुमारे ३० कर्मचारी याठिकाणी काम करीत असल्याची ओरड यापूर्वीपासून सुरू आहे. याठिकाणी काम कमी आणि उचापत्या जास्त असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी माजी महापौर उदय मडकईकर यांनी उघड केला होता.

Panjim Market
Rohan Khaunte: 'या' उपक्रमाअंतर्गत पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना; पर्यटनमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

त्यातूनच सोपो कर पावती न देत असल्याचे प्रकरण बाहेर आले होते. महानगरपालिकेच्या मार्केटमधील दुकानदारांचे भाडेकरार होत नसल्याने महानगरपालिका काही मोजक्याच सुविधा येथे देतात.

मासळी व भाजीपाला मार्केटवरील पत्रे खराब झालेले आहेत. पत्रे घालणारे आज या मार्केटची स्थिती पाहून गेले आहेत. उद्या, शनिवारी मासळी मार्केटमधील सुरुवातीला पत्रे बदलले जातील आणि त्यानंतर मुख्य इमारतीवरील पत्रे बदलण्याचे काम हाती घेतले जाईल. परंतु पाऊस सतत चालू राहिला तर काम करणे अवघड होईल.

- बेंटो लॉरीन, चेअरमन, महानगरपालिका बाजार समिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com