Kalasa- Mahadayi River: ‘कळसा’मुळे म्हादईच्या उपनद्यांवर परिणाम

प्रवाह थांबला: साट्रे, उस्ते परिसरातील नद्यांची जलपातळी घटली; पात्रेही कोरडे पडू लागली
Kalasa- Mahadayi River
Kalasa- Mahadayi RiverDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे म्हादईचा गळा घोटला जात आहे. मलप्रभेत पाणी वळविण्यासाठी कणकुंबीजवळ कळसा उपनदीचे पात्र उद्‍ध्वस्त केले. त्यामुळे त्या परिसरातील झरे, नाले, नैसर्गिक जलस्रोत बंद पडले असून गोव्याकडे येणारे पाणी कमी झाल्यामुळे जानेवारी महिन्यातच साट्रेतील नदीत पाणी कमी झाले आहे. पाणी कमी झाल्यामुळे सहजपणे चालत नदी पार करता येते. साट्रे, उस्तेतील उपनद्यांवर परिणाम झाला असून या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या बागायती, शेतीला मोठा फटका बसणार आहे.

कणकुंबीतील कळसा नाला उद्‍ध्वस्त झाल्यामुळे पावसाळ्यात म्हादईकडे येणारे पाणी कमी झाले असून अद्यापही काही प्रमाणात उलट्या दिशेन पाणी मलप्रभेत जात आहे. त्यामुळे उस्ते, साट्रेतील नदीत पाणी कमी झाल्याने जानेवारीतच पात्र कोरडे पडले आहे. काही ठिकाणी नदीच कोंडी निर्माण झाल्या आहेत.

गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता, अनेक ठिकाणी नदीतील दगड उघडे पडलेले दिसत आहेत. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात या परिसरात मोठी पाणी टंचाई जाणवणार आहे. याचा परिणाम थेट बागायती, शेतीबरोबरच नदीच्या काठावरील गावांवरही पाणी टंचाईची टांगती तलवार आहे.

बंधाऱ्यामुळे पाणी दिसते:-

१ . सुर्लातून खालच्या बाजूला असलेल्या साट्रेत पाणीसाठा कमी झाला असून फक्त बंधारा बांधल्यामुळे थोडे पाणी साठलेले दिसते. अन्यथा या ठिकाणी पूर्ण पात्र कोरडे झाले असते. तसेच चिखलीतून येणारे पाणीही कमी झाले आहे. गोळावली रिवे-सुर्लातून पुढे वेळसांच्या नदीतून जल प्रवाह खाली येतो, पण वरच्या भागातील पाणी कमी झाल्याने जानेवारी महिन्यातच येथील पात्रही सुकत चालले आहे.

Kalasa- Mahadayi River
Mahadayi Water Dispute: ‘म्हादई’वरून तापणार हिवाळी अधिवेशन

२. कर्नाटकने घाटावर कणकुंबी परिसरात केलेल्या कालव्याच्या कामामुळे अलीकडे उस्ते, साट्रे, गोळावली येथील उपनद्यातील पाणी कमी होत आहे. गेल्या पावसाळ्यात धबधबेही नेहमीसारखे दिसले नाहीत. कारण घाटावरून येणारे पाणी कमी झाले. बारामाही वाहणारे नैसर्गिक स्रोतही कमी झाले आहेत.

Kalasa- Mahadayi River
Mahadayi Water Dispute: ‘आरजी’चा खरा चेहरा समोर!

‘कळसा’चे पाणी हवेच!

उलट्या दिशेने मलप्रभा नदीकडे कळसा उपनदी व परिसरातील वळवलेले पाणी पूर्वीप्रमाणे गोव्यात यायलाच हवे. तरच साट्रे, उस्तेतील नदीत जल कायम राहणार आहेत. अन्यतः तो जानेवारीपासूनच बंद होणार आहे. हे संकट टाळण्यासाठी येत्या पावसाळ्यापूर्वी कळसाचे पाणी पूर्ववत गोव्याकडे येणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे मत साट्रे, सत्तरीतील शेतकऱ्यांचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com